Home गुन्हा पतीने अनैसर्गिकरित्या अत्याचार करून लैंगिक छळ

पतीने अनैसर्गिकरित्या अत्याचार करून लैंगिक छळ

0

परवेज शेख पिंपरी- महिलांवर सासरच्यांकडून अनेकवेळा अत्याचार होत असतात. नेहेमीच असे गुन्हे उघडकीस येत असतात. असाच एक प्रकार चिखली येथे घडला आहे. सासरच्यांनी महिलेचा शारीरिक आणि मानसिक चाल करत तिला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली आहे. पतीने अनैसर्गिकरित्या अत्याचार करून लैंगिक छळ केल्याची तक्रार २१ वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात केला आहे. 

एप्रिल ते २७ डिसेंबर दरम्यान हा प्रकार घडला आहे. त्यानुसार पती, सासू, सासरे, नणंद, भाचा आणि अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींनी संगनमत करून फिर्यादी महिलेला वेळोवेळी शिवीगाळ करत हाताने मारहाण करून वाईट वागणूक दिली. तसेच फियार्दी यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. पतीने फिर्यादी यांच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला आहे असा आरोप करण्यात आला आहे. या घटनेवर चिखली पोलीस तपस करत आहेत.