Home ताज्या बातम्या गेटवे ऑफ इंडियाजवळ समुद्रात बोटीचा अपघात, 45 जणांना वाचवण्यात यश

गेटवे ऑफ इंडियाजवळ समुद्रात बोटीचा अपघात, 45 जणांना वाचवण्यात यश

0

मुंबई : मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ समुद्रात रविवारी एका बोटीला झालेल्या अपघात 45 जणांना वाचवण्यात यश आले आहे. गेट वे ऑफ इंडिया जवळील समुद्रात बोटीवर पार्टी करण्यासाठी रविवारी टाइम नावाची बोट पार्टी करण्यासाठी 35 नागरिकांसह 10 बोट कर्मचाऱ्यांना घेऊन समुद्रात जात होती.

गेट वे ऑफ इंडिया पासून काही अंतर पुढे गेल्यावर अचानक या बोटीत पाणी शिरू लागल्याने बोटीवरील नागरिकांत गोंधळ उडाला. मात्र सुदैवाने एलिफंटाते गेट वे अशी प्रवासी बोट चालवणाऱ्या अष्टविनायक या बोटीच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आली. यानंतर त्यांनी तात्काळ बुडणाऱ्या बोटीवरील 45 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. अचानक बुडणाऱ्या टाइम या बोटीला स्थानिक नाविकांनी त्यांच्या इटत बोटींच्या मदतीने बाहेर काढून गेट वेच्या किनाऱ्यावर आणले. ही घटना घडल्यानंतर टाइम या बोटीचा मॅनेजर व पार्टी आयोजक फरार आहे. कुलाबा पोलीस ठाण्यात या घटनेची डायरी नोंद करण्यात आली आहे. अद्याप कुठलाही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.