Home ताज्या बातम्या गगनयानचे अंतराळवीर अंतराळात काय खातील-पितील? जाणून घ्या मेन्यू

गगनयानचे अंतराळवीर अंतराळात काय खातील-पितील? जाणून घ्या मेन्यू

0

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ एजेंसी इस्रोचे गगनयान मिशन डिसेंबर 2021 मध्ये लॉन्च करण्यात येईल. इस्रो प्रमुख डॉ. के. सिवन यांनी सांगितले की, यासाठी एअरपोर्टच्या चार जवानांची निवड करण्यात आली आहे. आता हे ट्रेनिंगसाठी रुस येथे जातील. मात्र आता हे अंतराळवीर अंतराळात सात दिवस काय खातील? काय पितील? तर याचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत.

गगनयानच्या अंतराळवीरांचे खाण्याचे मेन्यू
हे अंतराळवीर पृथ्वीवर चक्कर मारताना अंडा रोल, व्हेज रोल, मूंग डाळचा हलवा आणि व्हेज पुलाव खातील. हे जेवण मैसूर येथील डिफेंस फूड रिसर्च लेबोरेटरी तयार करतील. यासोबतच जेवणाचे हीटरही देण्यात येईल. हे DRDO ने बनवले आहे.

पिण्यासाठी विशेष पॉकेट
गगननॉट्सच्या पाणी आणि ज्यूससाठी विशेष प्रकारचे पॅकेट बनवण्यात आले आहे. हे विना गुरुत्वाकर्षणच्या वातावरणात चांगले राहतील . हे अंतराळात खराब होणार नाही अशा पद्धतीने बनवण्यात आले आहे.

जाणून घ्या काय आहे गगनयान मिशन?
गगनयान मिशनच्या माध्यमातून ISRO तीन अंतराळवीरांना पृथ्वीपासून 400 किमीवर अंतराळात सात दिवसांची यात्रा करायला लावेल. या अंतराळवीरांना सात दिवसांसाठी पृथ्वीच्या लो-ऑर्बिटमध्ये चक्कर लावावे लागतील. या मिशनसाठी ISRO ने भारतीय वायुसेनेतून अंतराळवीर निवडण्यास सांगितले होते.

चार एस्ट्रोनॉट्स ट्रेनिंगासाठी रुसला जातील
वायुसेनाने सुरुवातीला 25 पायलट निवडले होते. आता यामधून 12 जणांची निवड करण्यात आली आहे. हे ट्रेनिंगसाठी रुसमध्ये जातील. यामधील चारही रुसमध्ये ट्रेनिंग करतील. त्यांची निवड रुसची ट्रेनिंग देणारी एजेंसी करेल.

गगनयानपुर्वी असतील दोन अनमॅन्ड मिशन
डिसेंबर 2021 मध्ये इस्रो तीन भारतीयांना इंतराळात पाठवतील. यापूर्वी दोन अनमॅन्ड मिशन असतील. हे डिसेंबर 2020 आणि जुलै 2021 मध्ये केले जातील. या दोन्ही मिशनमध्ये गगनयानला कोणत्याही अंतराळवीरांशिवाय अंतराळात पाठवण्यात येईल.