Home ताज्या बातम्या मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे सीआयआयच्या सहकार्याने आयोजित बैठक

मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे सीआयआयच्या सहकार्याने आयोजित बैठक

0

परवेज शेख : मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज सीआयआयच्या सहकार्याने आयोजित बैठकीत देशातील उद्योजकांसोबत संवाद साधला. महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्ट्या सर्वात प्रगत राष्ट्र असून पुढील काळात राज्यातून एकही उद्योग इतर राज्यांमध्ये जाऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योगांना येणाऱ्या अडचणींचे फास्टट्रॅकवर निराकरण करून राज्यात वैविध्यपूर्ण औद्योगिक विकास करण्यात येईल तसेच आमचे सरकार कुठल्याही विकासकामांना स्थगिती देणार नसून महत्वाचे प्रकल्प अधिकाधिक जलदगतीने पूर्ण करण्याचे नियोजन करत आहे असे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईसह संपूर्ण राज्यात पर्यटनाला गती देण्यात येऊन राज्यातील शहरांची एक चांगली ओळख निर्माण करण्यात येईल आणि शिक्षण क्षेत्रात दर्जेदार बदल घडवण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई जी, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, कॅबिनेट मंत्री अनिल परब जी, मुख्य सचिव अजोय मेहता जी उपस्थित होते.