Home ताज्या बातम्या नाशिकच्या महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरने 3-2 च्या फरकाने मारली बाजी

नाशिकच्या महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरने 3-2 च्या फरकाने मारली बाजी

0

कुस्ती खेळात अत्यंत महत्वाची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात होत आहे

पुणे : महाराष्ट्र राज्यात कुस्ती या खेळाला अनन्यसाधरण असे महत्व आहे. कुस्ती खेळात अत्यंत महत्वाची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात होत आहे. या स्पर्धेतील अंतिम लढतीत कुस्तीपटू हर्षवर्धन सदगिरने 3-2 च्या फरकाने बाजी मारली आहे. त्यामुळे हर्षवर्धन सदगिर यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. हर्षवर्धनने शैलेश शेळकेचा पराभव केला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे हे 63 वे वर्ष होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हर्षवर्धनला मानाची गदा देऊन गौरविण्यात आलं आहे.

पुण्याच्या म्हाळूंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या अंतिम फेरीसाठी अनेक कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती. महत्वाची गोष्ट म्हणजे शैलेश शेळके आणि हर्षवर्धन सदगीर हे दोन्ही मल्ल काका पवार यांच्या तालमीतले आहेत. त्यामुळे हा विजय माजी अर्जुन पुरस्कार विजेते प्रशिक्षक काका पवार यांच्यासाठीही महत्वाचा मानला जात होता.

दरम्यान, कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर यांच्या मूळगावी जल्लोष करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावात जल्लोष गावकऱ्यांनी केला. हर्षवर्धन सदगीर हा अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावचा मुळ रहिवासी आहे. लाईट नसल्यानं गावकर्यांनी मोबाईलवर अंतिम सामना पाहिला. हर्षवर्धनने मानाची गदा पटकावल्याने गावकरी आनंदी आहेत.