बुलडाणा : संपूर्ण देशभर हिरा ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून पन्नास हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांची गुंतवणूकदारांची फसवणूक केल्या प्रकरणी कंपनीच्या CEO डॉ.नोहेरा शेख यांना बुलडाणा पोलिसांनी चौकशी साठी ताब्यात घेतले असून न्यायालयाने नोहेरा शेख यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हैद्राबाद येथील हिरा ग्रुप ऑफ कंपनी च्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना जास्तीच्या रुपयांचे अमिष दाखवून देशभरातील हजारो गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना, पन्नास हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा गंडा घालणाऱ्या या कंपनी विरोधात ठिकठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत. भायखळा पोलिसांनी या कंपनीच्या CEO नोहेरा शेख यांना अटक करून न्यायालयाने नोहेरा शेख यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तर बुलडाणा मध्ये याच कंपनी विरोधात 16 लाख रुपयांपेक्षा जास्त फसवणूक केल्याची तक्रार झाल्याने बुलडाणा पोलिसांनी नोहेरा शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने शेख यांनी बुलडाणा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अटक पूर्व जामीन साठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्याने बुलडाणा शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोहेरा शेख यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन न्यायालयात सादर करून जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी डॉ. नोहेरा शेख यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर बुलडाणामध्ये याच हिरा कंपनीच्या माध्यमातून अजूनही लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.






















WhatsApp