Home ताज्या बातम्या पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशीप प्रोग्रॅम (पी-४) चे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.सुहास वारके यांच्याकडून कौतुक

पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशीप प्रोग्रॅम (पी-४) चे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.सुहास वारके यांच्याकडून कौतुक

0


कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाला देशभरातून जनता आली होती त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कडेकोट व्यवस्था केली त्यात सहकार्य म्हणून या वेळी पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशीप प्रोग्रॅम पी-४ या उपक्रमाच्या माध्यमातून खाजगी सुरक्षा रक्षक संस्थेच्या रक्षकांनी आणि भरती पूर्व प्रशिक्षण शिबिरातील स्वयंसेवकांनी पार पडला हा प्रयोग पहिल्यांदाच बंदोबस्तामध्ये करण्यात आला.

विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, संघटना, आंबेडकरवादी सर्व गट, लोकप्रतिनिधी, व्ही.आय.पी.,अभिवादन करण्यासाठी बुधवार रात्री १२.३० पासून पुणे स्तंभ परिसरामध्ये लाखो जनतेनी गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यास आणि घातपाती कृत्य करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यास पोलीस दल सज्ज होते त्याच बरोबर सर्व परवानाधारक खाजगी सुरक्षा रक्षक संस्थेच्या मालकांनी आपले एकूण पाचशेहून अधिक स्वयंसेवक आणि प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी पोलीस दलाच्या ताफ्यात बंदोबस्त करतांना दिसले.

बंदोबस्तातील नियमनासाठी विविध धोके, पाकीटमार, मोबाईल चोर, शांततेचा भंग करणारे टोळके, सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट व भुरट्या चोरांचा उच्छाद या सा-या गर्तेत सुरक्षा यंत्रणेला हे मोठे आव्हान होते त्यात रोड रोमिओंवर आळा घालण्यासाठी रक्षकांच्या माध्यमातून स्वयंसेवकांची फळी सज्ज केली आणि ट्रॅफिक वॉर्डन, फायर वॉर्डन, खासदूत व विशेष पोलीस दूत म्हणून १८ तास पोलिसांच्या मदतीला उभे राहिले.

अभिवादन करण्यासाठी येणारी गर्दी लक्षात घेऊन विशेष सुरक्षा व्यवस्था पुरविण्यासाठी मे. भारत शिल्ड फोर्स प्रा. ली, मे. अशोक फॅसिलिटी सर्व्हिसेस,मे. एस एम डब्लु मार्शल सिक्युरिटी प्रा. ली,मे. भोसले ग्रुप,मे. एस के असोशिएट,मे. एस जे फॅसिलिटी मॅनेजमेंट, मे. एन एस पी एस प्रा ली, मे. जी.१.एस सिक्युर सोल्युशन प्रा. ली,मे. प्रोटेक्ट शिल्ड फोर्स,मे. राज सिक्युरिटी एन्ड फॅसिलिटी मॅनेजमेंट, मे. हाय अलर्ट सिक्युरिटी सर्व्हिसेस अँड एन्टरप्रायझेस, मे. बिमला सिक्युरिटी फोर्से,मे. यशराज सिक्युरिटी सर्व्हिस & प्लेसमेंट सर्व्हिस, मे. राजतारा फॅसिलिटीज सर्व्हिसेस,मे. सागर सिक्युरिटी सर्व्हिसेस, मे. स्वामी ओम सिक्युरिटी, मे. एस के सर्व्हिसेस,मे. सनराईस सिक्युरिटी एजन्सी, मे. बालाजी इंटरप्राझेस वारजे, मे. एस एम ग्रुप, मे. ईगल आय गार्डस सर्व्हिसेस, मे. चिराग इंडस्ट्रीज़ सर्व्हिसेस,मे. जयमा एन्टरप्रायझेस,मे. डी. पी. एस, मे. थर्ड आय सिक्युरिटी & बाउन्सर सर्व्हिसेस,मे. परफेक्ट सर्व्हिसेस प्रोप्रटी सोल्युशन,मे. फिनिक्स सिक्युरिटी एन्ड फॅसिलिटीस सर्व्हिसेस,

मे. सिक्युराईस,मे. संपदा एन्टरप्राइसेस,मे. ओम साई सेफगार्ड सर्व्हिसेस, मे. के सम्राट ग्रुप,मे. ब्लॅक कामाडो सिक्युरिटी, मे. स्वामी ओम सिक्युरिटी, मे. स्टार सिक्युरिटी सर्व्हिसेस, मे. प्रसन्ना असोशिएट, मे. रिलायबल एच आर फॅसिलिटी, मे. कॉर्डन सिक्युरिटी अँड अलाईड सर्व्हिसेस प्रा. ली, मे. क्विक रिएक्शन फोर्स,मे. सेवेन फोर्से डिटेक्टीव & सिक्युरिटी सर्व्हिसेस,मे. ब्लॅक कॅट सिक्युरिटी सर्व्हिसेस, मे. एम बी आर एन्टरप्राइसेस प्रा. लि.,मे. तनिष एन्टरप्राइसेस, मे. सहारा एन्टरप्राइसेस, मे. डी के ग्रुप मॅनपावर सर्व्हिसेस, तसेच द रॉयल अकॅडेमी हडपसर ,…इ यांनी आपले कर्तव्य पार पाडले.


सुरक्षा गार्ड बंदोबस्तादरम्यान त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि हि पण एक देशसेवा आहे त्यातून आपले पुणे आपण स्वतः सुरक्षित करू शकतो. गर्दीचे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, विशेष सुरक्षा पुरविण्याच्या कामी आम्ही मदत करतो आहे तसेच बंदोबस्तादरम्यान कोणतेही गालबोट लागू नये,अफवांवर विश्वास ठेवू नये यासाठी आम्ही जनतेची सेवा म्हणून देशसेवा करत आहोत आपण एक आदर्श नागरिक म्हणून आपला सहभाग वाढवला आहे अशा भावना व्यक्त केल्या.


जिल्हाधिकारी मा. नंदकिशोर राम, विशेष पोलीस महानिरीक्षक मा. सुहास वारके, पोलीस अधीक्षक मा. संदीप पाटील यांनी सर्वांचे कौतूक केले.
संपर्क:- सचिन मोरे मुख्य समन्वयक प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशीप प्रोग्रॅम पी-४ (9623612463)