Home गुन्हा बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे दोन्ही आरोपी गजाआड

बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे दोन्ही आरोपी गजाआड

0


पुुणे-परवेज शेख दि.11/1/2020 रोजी युनीट-१- चे हाद्दित पेट्रोलिंग करीत असताना सचिन जाधव व ईम्रान शेख यांना त्यांचे बातमी दारामार्फत बातमी मिळाली की प्लाॅट नं ४ मंगळवार पेठ पुणे येथे अश्विनी मित्र मंडळाचे कट्ट्याजवळ दोन इसम उभेेेे असून त्यांचेकडे देशीी बनावटीचे पिस्तूल असले बाबत समजले सदरची बातमीी वरिष्ठांना कडून त्यांनी मार्गदर्शक सूचना देवुन कायदेशीर कारवाई करणे बाबत सूचना दिली.

त्याप्रमाणे युनिट 1 चे पोलीस उप निरीक्षक उत्तम बुदगुडे ,पो.हवा जगताप ,पो ना सचिन जाधव,पो ना ईम्रान शेख,पो ना सुधीर माने,पो ना ईरफान मोमीन असे खाजगी वाहने बातमीचे ठिकाणी जाऊन खात्री करून छापा मारून त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारले त्यांनी आपली नाव (१)राजेंद्र शिवाजी तावरे वय ३५ वर्ष रा.रांजेगांव ता.भोर जि.पुणे (२)मोगल्या ऊर्फ दिपक बाळासाहेब पासलकर वय ३०वर्ष रा.पानशेत गांव कुरणबुद्रुक ता.वेल्हा जि पुणे असे सांगितले.


या दोघांना ताब्यात घेतले त्यांंचेकडे एक गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुस (रांऊड)किं ४०४०० रु चा माल मिळून आल्याने त्यांचेवर आर्मस अॅक्ट ३ (२५) महाराष्ठट्र पो अॅ ३७ (१)सह १३५ प्रमाणे कारवाई केली आहे,त्याची वैधकीय तपासणी करून त्यांना समर्थ पोलीस स्टे कडे पुढिल कारवाई साठी दिलेले आहेत.
वरील गुन्हेगार हिंजवडी पोलीस स्टे गुन्हा रजि नं -६२३/२०१९ भा द वी कलम ३०७ ,५०४,३४ ह्या गुन्ह्यात पाहीजे अरोपी आहे.
तसेच त्या दोघावर खून ,खूनाचा प्रयत्न,खंंडणी ,आर्म्स अॅक्ट प्रमाणे पुणे ग्रामीण पुणे शहरात गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी ही श्री अशोक मोराडे ,सो अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री बच्चन सिंह, पोलीस उपायुक्त गुन्हे ,श्री डॉ शिवाजी पवार, सौ सहा पोलीस आयुक्त गुन्हे प्रतिबंधक यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरुण वायकर ,पो उप निरीक्षक उत्तम बुदगुडे ,पो ना सचिन जाधव, इमरान शेख, सुधाकर माने ,योगेश जगताप ,तुषार माळवदकर ,विजेसिंग वसावे, प्रकाश लोखंडे बाबा चव्हाण, सुभाष पिंगळे ,अशोक माने ,उमेश काटे ,संजय बरकडे ,अमोल पवार, गजानन सोनुने, इरफान मोमीन ,श्रिकांत वाघवले ,अजय थोरात यांनी केली आहे.