Home बातम्या उन्नाव बलात्कार : सेंगर यांची उच्च न्यायालयात धाव

उन्नाव बलात्कार : सेंगर यांची उच्च न्यायालयात धाव

0

नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेले कुलदीपसिंग सेंगर यांनी तिस हजारी कोर्टाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सेंगर यांनी जन्मठेपेच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

यूपीच्या उन्नाव येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरविलेले भाजपाचे माजी आमदार कुलदीपसिंग सेंगर यांना तीस हजारी कोर्टाने बलात्कार प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर शशीसिंग याना निर्दोष मुक्त केले आहे.

तिस हजारी कोर्टाने कुलदीपसिंग सेंगर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यार या प्रकरणातील सह-आरोपी शशी सिंग यांना पुराव्याअभावी निर्दोष सोडले आहे .