Home बातम्या राजकारण मी स्वतःला ‘जाणता राजा’ कधीच संबोधत नाही- शरद पवार

मी स्वतःला ‘जाणता राजा’ कधीच संबोधत नाही- शरद पवार

0

सातारा: ‘मी स्वतःला जाणता राजा कधीच संबोधत नाही किंवा संबोधून घेत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रामाणिकपणे ज्याने वाचला असेल त्यांना माहीत असेल की त्यांची उपाधी छत्रपती हीच होती. जाणता राजा अशी नव्हती. जाणता राजा हा शब्द रामदासांनी आणला. काही लोक म्हणतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरू होते, हे साफ खोटं आहे. महाराजांच्या गुरू राजमाता जिजामाता याच होत्या. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे जिजामातांच्या संस्कारांतून घडले’, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

शरद पवार म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या काळात रामदास नव्हते. मात्र काहींच्या हाती लेखणी होती. त्यांनी या कर्तृत्वसंपन्न महामानवाला घडवण्याचे काम रामदासांनी केले अशी कमाल लेखणीद्वारे केली आणि आपण मानू लागलो की महाराजांचे कर्तृत्व हे रामदासांमुळे आहे, पण हे खरं नव्हे’.

‘छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व हे स्वकर्तृत्व, स्वतःचे शौर्य आणि मातेचे मार्गदर्शन व संस्कार यातून हे महाआयामी व्यक्तित्व घडले. त्यामुळे त्यांना कोणी जाणता राजा उपाधी देण्याची गरज नाही. छत्रपती हे जन्माने, कर्तृत्वाने लोकांच्या मनात, अंतःकरणात छत्रपतीच राहतील, त्यात दुसऱ्या कोणी काही म्हणण्याची गरज नाही. तसा आमचा आग्रह कधी असणार नसल्याचे पवार म्हणाले’.