Home ताज्या बातम्या 31 वा रस्ता सुरक्षा सप्ताह 2020

31 वा रस्ता सुरक्षा सप्ताह 2020

0

31 वा रस्ता सुरक्षा सप्ताह 2020 हा दिनांक 11/01/2020 ते दिनांक 17/01/2020 या कालावधीत राबविण्यात येत आहे. सदर अभियानाचा उद्देश रस्त्यांवरील वाढणारे अपघात व मृत्यूंची संख्या कमी करण्याचा असुन त्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती व्हावी या करीता वेगवेगळया प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दिनांक 15.01.2020 रोजी या कार्यक्रमाचा उदघाटन समारंभ पोलीस मुख्यालय अलिबाग येथील जंजिरा सभागृह येथे आयोजीत करणेत आला होता. सदर समारंभाचे उदघाटन हे सन्माननिय अध्यक्ष मा.श्री.डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी रायगड यांचे हस्ते झाले. सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री.अनिल पारस्कर, पोलीस अधीक्षक रायगड, मा.श्री.दिलीप हळदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अलिबाग हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी रायगड जिल्हयातील अपघातांचे प्रमाण हे सन 2019 सालांतील जिल्हा पोलीस दल व परिवहन विभाग व संबंधीत विभाग यांचे अथक परिश्रमाने 28 टक्यांनी कमी झाल्याने मा.मुख्यमंत्री महोदयांचे हस्ते मुंबई येथे रायगड जिल्हयाचे जिल्हाधिकारी म्हणुन सत्कार करणेत आल्याचे आपल्या उपदेशात्मक भाषणात सांगुन भविष्यांत अधीक अपघातांचे प्रमाण कमी होणेसाठी अधीक कार्यप्रणाली राबवुन अपघात कमी करणेसाठी सर्वतोपरी कार्यवाही करणेचे आवाहन केले. तसेच वाहन चालविताना प्रत्येक वाहन चालकाने, मुले, मुली, पालक यांनी स्व:त हेल्मेट परिधान करून व चार चाकी वाहन चालविताना सीटबेल्ट लावुनच वाहन चालविण्याचे तसेच मुख्य म्हणजे वाहन चालविताना मोबाईलवर न बोलण्याचे आवाहन करून त्याबाबतची जबाबदारी प्रत्येक कुटुंब प्रमुख्याने आपल्या पाल्यांना व प्रत्येक तरूण वर्गाने आपआपल्या मित्रपरिवारास सांगणे बाबतचे आवाहन केले. उपस्थित मा.पोलीस अधीक्षक रायगड यांनी रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करावे लागते, याचा अर्थ मोटार वाहन कायदयाची पायमल्ली होते. त्याकरीता कोठेतरी त्याचेवर निर्बध येणेसाठी प्रत्येकाने स्वरक्षणासाठी तरी किमान दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट परिधान करणे, चार चाकी वाहन चालविताना सीटबेल्ट लावणे इत्यादी नियमांचे पालन करावे. स्व:तच्या जिवापेक्षा कोणतेही काम महत्वाचे नाही असे उपदेशात्मक आवाहन त्यांच्या भाषणामध्ये करून प्रत्येक चालकाने मोटार वाहन नियमांचे पालन केल्यास निश्चीतपणे अपघातांच्या संख्येमध्ये घट निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच अपघात कमी होण्याच्या दृष्टीने उपदेशात्मक आवाहन मा.श्री.दिलीप हळदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अलिबाग यांनी केले. सदरील कार्यक्रम हा रायगड जिल्हा पोलीस दल व उप प्रादेशीक परिवहन विभाग, पेण यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत करणेत आला होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती उर्मिला पवार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण यांनी केले व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड.श्री.के.डी.पाटील यांनी केले.


रस्ता सुरक्षा अभियान सप्ताहाचे कालावधीत एक जनजागृती कार्यक्रमाचा भाग म्हणुन जिल्हा स्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चित्रांमध्ये अपघातातील दुष्परिणाम, मोटार वाहन कायद्याचे अंमलबजावणी न करता वाहने चालविल्याने होणारे दुष्परिणाम, अपघातातील मयत झालेल्या कुटुंबीयांना भेडसावणा-या समस्या, मद्यप्राशन करून वाहने चालविल्याने होणारे अपघात इत्यादी बाबत विषयांकित चित्रांची निवड करून चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती, त्या चित्रकला स्पर्धेचा निकाल दिनांक 15/01/2020 रोजी जाहीर करून मा.जिल्हाधिकारी रायगड, मा,पोलीस अधीक्षक रायगड व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद अलिबाग यांचे हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवुन विजेत्यांना गौरविण्यात आले. तसेच 25 वर्षे एस.टी.महामंडळामध्ये अविरत चालकाची सेवा विना अपघात करणा-या 02 एस.टी.चालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 31 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान सप्ताहातील भाग म्हणुन दिनांक 15.01.2020 रोजी विधी न्यायालय अलिबाग व पोलीस दल यांचे संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅलीचे आयोजन अलिबाग शहरात करण्यात येवुन त्यामध्ये हायस्कुल मधील भोनंग शाळेतील व चोंढी शाळेतील आर.एस.पी.चे विदयार्थी सहभागी झाले होते.