Home शहरे जळगाव एरंडोल येथे बालिका सप्ताहाचा शुभारंभ तहसिलदार अर्चना खेतमाळीस यांच्या हस्ते

एरंडोल येथे बालिका सप्ताहाचा शुभारंभ तहसिलदार अर्चना खेतमाळीस यांच्या हस्ते

0

प्रतिनिधी : एरंडोल मंगळवार २१ जानेवारी रोजी येथे बालविकास सेवा योजनेतर्फे ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या योजनेअंतर्गत स्वाक्षरी मोहिमेने बालिका सप्ताहाचा शुभारंभ तहसिलदार अर्चना खेतमाळीस यांच्या हस्ते करण्यात आले. २० जानेवारी २६ जानेवारी दरम्यान बालिका सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या सप्ताहाअंतर्गत ग्रामीण भागात मुलींचे जन्माचे प्रमाण वाढविण्यासाठी मुलीच्या जन्माचे स्वागत,माता सभांमध्ये महिलांना मार्गदर्शन,बेटी बचाव बेटी पढाव’ ची प्रतिज्ञा इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी रा.ति. काबरे विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा देण्यात येऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी शैलजा पाटील,उर्मिला बच्छाव,महेंद्र पाटील,विजया बडगुजर, सुनंदा चौधरी, चेतन गिरासे,पवन राठोड आदी उपस्थित होते.
फोटो ओळी – एरंडोल येथे तहसीलदार अर्चना खेतमाळीस या स्वाक्षरी करून बालिका सप्ताहाचे उद्घाटन करतांना.सोबत प्रकल्प अधिकारी शैलजा पाटील व इतर.