बाळासाहेब ठाकरेंच्या 94व्या जयंतीसाठी शिवसेना सज्ज, आज होणार वचनपुर्ती मेळावा

- Advertisement -

मुंबई :आज गुरुवारी 23 जानेवारीला बाळासाहेबांची 94 वी जयंती आहे. या दिवशीच शिवसेनेकडून जल्लोष मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतल्या बीकेसीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जाहीर सत्कार केला जाणार आहे. त्यामागे कारण म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शिवसैनिकाला विराजमान करण्याचं स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेले वचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केलं आहे. याच निमित्ताने हा वचनपुर्ती मेळावा होत आहे.शिवसैनेचा मुख्यमंत्री झाल्यामुळे प्रत्येक शिवसैनिकामध्ये जल्लोष आहे. यामुळे जल्लोष साजरा करण्यासाठी खास शिवसेनेनं जल्लोष मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली आणि महाराष्ट्रातील राजकारणात एक नवं समीकरण पाहायला मिळालं. यामुळे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नपूर्ती झाली आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. मात्र यामुळे प्रखर हिंदुत्व काहीसं बाजूला पडलंय की काय असे चित्र समोर दिसतेय. मात्र शिवसेनेने पुन्हा ‘चलो अयोध्ये’चा नारा दिला. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारच्या जल्लोष मेळाव्यात अयोध्येसह विविध विषयांवर नेमकी काय भूमिका मांडणार हे पाहण अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. 

- Advertisement -