Home शहरे अमरावती दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण आग

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण आग

0

अमरावती : आपल्या संपूर्ण कुटुंबासह शेगावला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारला अचानक भीषण आग लागल्याने कार संपूर्ण जळून खाक झाल्याची घटना अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग सहा वर आज सायंकाळी साडेपाच वाजता मोझरी येथे घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

नागपूर येथील रहिवासी असलेले अमर निचाळ त्यांच्या i 10 कार क्रमांक MH-49-EA 1339 ने आज शेगाव येथे दर्शनासाठी जात असताना राष्ट्रीय महामार्ग सहा वर मोझरी येथे अचानक त्यांच्या गाडीने समोरील भागाकडून पेट घेतला.   गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच त्यांनी गाडी थांबवून बाहेर पडल्याने कुठलीही इजा त्यांना झाली नाही.  कारला आग लागून एक तास उलटुन गेल्यानंतर ही अग्निशमन दलाचे बंब पोहचु न शकल्याने कारचा घटनास्थळीच कोळसा झाला.