Home शहरे अहमदनगर सुपरवायझरची सिक्‍युरिटी गार्डकडून हत्त्या

सुपरवायझरची सिक्‍युरिटी गार्डकडून हत्त्या

0

नगर : एमआयडीसीमधील क्रॉम्टन कंपनी मध्ये सिक्‍युरिटीगार्ड ने सुपरवायझरची कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कंपनीत ड्युटी देण्यावरून वाद झाला असल्याचे प्राथमिक माहिती समोर आले आहे. राजाराम नामदेव वाघमारे (वय- 48 रा. भिंगार) असे हत्या झालेल्या सुपरवायझरचे नाव आहे. सिक्‍युरिटीगार्ड गार्ड किरण रामभाऊ लोमटे (रा. देवळाली प्रवरा ता. राहुरी) याने ऊस तोडणी कोयत्याने वाघमारे यांच्यावर वार करून हत्या केली.

सकाळी सिक्‍युरिटी गार्ड लोमटे कामावर आला असता सुपरवायझर वाघमारे यांनी नियमानुसार लोमटे याला कामाची सुचना दिली. कामाच्या सुचना देऊन देखील सिक्‍युरिटी गार्ड लोमटे कामावर हजर झाला नाही. लोमटे हा कंपनी बाहेर आला व नंतर काही वेळात कोयता घेऊन कंपनी मध्ये आला. कोयत्याने वाघमारे यांच्यावर सपासप वार केल्याने ते गंभिर जखमी झाले. त्यांना उपचारार्थी रुग्णालयात हजर केले असता वाघमारे मयत झाले असल्याचे सांगण्यात आले. मात्र या घटनेमुळे कंपनीमध्ये एकच गोंधळ उडाला.