Home ताज्या बातम्या पी-४ च्या मुख्यालयाचे उदघाटन सोहळा

पी-४ च्या मुख्यालयाचे उदघाटन सोहळा

0

पुणे : मा.पोलीस आयुक्त डॉ . के. वेंकटेशम (भापोसे), मा. पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (भापोसे) यांच्या मार्गदर्शनाखाली मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) मा.अशोक मोराळे (भापोसे) यांनी पोलीस प्रायव्हेट सेक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्राम (पी-४) या उपक्रमाच्या भव्यदिव्य पद्धतीने मुख्यालयाचे उदघाटन करण्यात आले.

या उदघाटन प्रसंगी कामगार आयुक्त तथा पुणे जिल्हा सुरक्षा मंडळाचे अध्यक्ष मा. निखिल वाळके, स्थानिक आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, सिनेअभिनेते सिद्धेश्वर झाडबुके, पुणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नलावडे साहेब, पोलीस निरीक्षक करपे साहेब, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती राठोड मॅडम, ब्रिगडिअर निकम सर, कर्नल गिल सर, सीओडी कामगार संघाचे जनरल सेक्रेटरी चंदन आल्हाट, सीओडी डेपो जेसीएम सदस्य बाळासाहेब चव्हाण, सीओडी कामगार युनियनचे उपाध्यक्ष अनिल शिवकर ..इ उदघाटन प्रसंगी उपस्थित होते.

खाजगी सुरक्षा रक्षक संस्थेच्या मालकांना व त्यांच्या जवळपास २० हजार कर्मचार्यांना पोलिस ठाण्याशी जोडले आहे. या सर्व मालकांना व त्यांच्या कर्मचाऱ्यांना एकाच कार्यालयातून सामाजिक उपक्रम चालवण्यासाठी प्रजासत्ताक दिनाप्रसंगी सुरक्षा रक्षक सेवा पुरवठादार संस्थेचे दोनशेपेक्षा अधिक मालक चालक व सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्या मध्ये विशेष संवाद साधण्यासाठी या कार्यालयाची निर्मिती केली आहे.

मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) मा.अशोक मोराळे (भापोसे) यांनी कार्यक्रम प्रसंगी सांगितले कि पी-४ च्या साहयाने माहितीची देवाण घेवाण करणे शक्य आहे. खाजगी संस्थेच्या मालकांनी परिसरातील संशयास्पद माहिती पोलीस ठाण्यांतर्गत केलेल्या व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये पाठवावी आमच्याकडून तात्काळ कारवाई केली जाईल व नागरिकांची सेवा करण्यासाठी आपण पोलीस प्रशासनाला जी मदत करत आहेत ती अतिशय मोलाची व अभिमानस्पद आहे, सतर्क नागरिक म्हणून आपण ची चळवळ उभी करत आहेत त्यासाठी पोलीस प्रशासन आपल्या पाठीशी उभे असेल. गुन्हेचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्वाचा आहे .पी-४ काही आदर्श मालकांचा सन्मान करण्यात आला.

कामगार आयुक्त तथा पुणे जिल्हा सुरक्षा मंडळाचे अध्यक्ष मा. निखिल वाळके यांनी पी-४ मधील सुरक्षा एजेन्सीच्या मालकांचे विशेष कौतुक केले, गणपती विसर्जन, ३१ डिसेंबर बंदोबस्तामध्ये, गुन्हे उघड करण्यासंबंधी, वाहतूक सुरळीत करण्याकामी व सुव्यवस्था राखण्यासाठी कर्तव्यात पी-४ मधील मालक कमी पडत नाहीत.

सामाजिक कार्यातील नोंदवलेला सहभाग पाहून आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी काही मालकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

पी-४ चे मुख्य समन्वयक सचिन मोरे यांनी या कार्यक्रम प्रसंगी सांगितले कि सतर्क पुणेकर अँप, बडीकॉप, पोलीस काका, पुणे ट्राफिक क्लब, उच्चतम सेवा पीडित साहाय्य S.E.V.A.(Service Excellence & Victim Assistance), भरोसा सेल या मध्ये चालक मालक हे एक पुणेकर आहेत त्यात त्यांनी पोलीस प्रशासनाच्या सर्व उपक्रमात पी-४ मधील सर्व मालक सहभाग मोठ्या प्रमाणात नोंदवतात, त्यांच्या यशोगाथेचा गौरवाचा व कार्याचा पाडा वाचून दाखवला.

पी-४ च्या मुख्यालयाचे ध्वजरोहण मे. चिराग इंडस्ट्रीज़ सर्व्हिसेस खराडी यांचे सर्वेसर्वा संभाजी उकिरडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी पुण्यातील राज सिक्युरिटी एन्ड फॅसिलिटी मॅनेजमेंट उंड्री, पुणे, एम बी आर एन्टरप्राइसेस प्रा. लि. विश्रांतवाडी,कॉर्डन सिक्युरिटी अँड अलाईड सर्व्हिसेस प्रा. ली. बी टी कवडे रोड,जी.१.एस सिक्युर सोल्युशन प्रा. ली. रहाटणी, प्रसन्ना असोशिएट हडपसर,फिनिक्स सिक्युरिटी एन्ड फॅसिलिटीस सर्व्हिसेस कात्रज,परफेक्ट सर्व्हिसेस प्रोप्रटी सोल्युशन वाकड,रिलायबल एच आर फॅसिलिटी प्रा. लि. दिघी, स्टार सिक्युरिटी सर्व्हिसेस कोथरूड, भारत शिल्ड फोर्स प्रा. ली. हडपसर,अशोक फॅसिलिटी सर्व्हिसेस वडगाव शेरी,एन एस पी एस प्रा. ली. हडपसर,एस एम ग्रुप मारुंजी-मुळशी, एस एम डब्लु मार्शल सिक्युरिटी प्रा. ली. लक्ष्मीरोड,एस के असोशिएट दिघी, एस के सर्व्हिसेस खराडी, एस जे फॅसिलिटी मॅनेजमेंट सुसगाव, के सम्राट ग्रुप विश्रांतवाडी, क्विक रिएक्शन फोर्स विश्रांतवाडी, सहारा एन्टरप्राइसेस वाघोली,जे के एन्टरप्रायझेस दिघी,डी के ग्रुप मॅनपावर सर्व्हिसेस बिबवेवाडी, डी. पी. एस ग्रुप बिबवेवाडी, थर्ड आय सिक्युरिटी & बाउन्सर सर्व्हिसेस देहूरोड,देविका फॅसिलिटीज प्रा. ली. देहूगाव, ब्लॅक कमांडो सिक्युरिटी मार्केट यार्ड,प्रोटेक्ट शिल्ड फोर्स पिंपरी चिंचवड,बालाजी इंटरप्रायझेस,वारजे बालाजी सिक्युरिटी फोर्स आळंदी , त्रिशूल सिक्युरिटी सर्व्हिसेस,साळुंखे एन्टरप्राइसेस विमाननगर,भोसले ग्रुप कात्रज, भोसले सिक्युरिटी एजेन्सी दिघी,ईगल आय बाउन्सर & गार्डस ग्रुप प्रा. लि. एन आय बी एम,राजतारा फॅसिलिटीज सर्व्हिसेस हडपसर,सनराईस सिक्युरिटी एजन्सी चंदननगर, सागर सिक्युरिटी सर्व्हिसेस वडगाव शेरी,संपदा एन्टरप्राइसेस बोपोडी,स्वामी ओम सिक्युरिटी सर्व्हिसेस कात्रज,एम सिक्युरिटीज् मानकर चौक,स्वामी समर्थ एन्टरप्रायझेस हडपसर, हाय अलर्ट सिक्युरिटी सर्व्हिसेस अँड एन्टरप्रायझेस आळंदी, फ्रंटिअर सिक्युरिटी सर्व्हिसेस दौंड, एस .टी.एफ प्रा.ली, पी.आर एन्टरप्रायझेस,ओम साई सेफगार्ड प्रा.ली, एस अँड जी सेक्युरिटी फोर्स, आर ३ एस सिक्युरिटी सर्विसेस, गुरमित सिंग गिल सेक्युरिटी एजेन्सी, पॅसिफिक सेक्युरिटी सर्विसेस …इ सन्मानीय कंपनीचे मालक उपस्थित होते