Home बातम्या शिवभोजन थाळीला बोगस लाभार्थीचे ग्रहण, शुभारंभाला दिवस उलटत नाही तोच गैरप्रकार उघड

शिवभोजन थाळीला बोगस लाभार्थीचे ग्रहण, शुभारंभाला दिवस उलटत नाही तोच गैरप्रकार उघड

0

रत्नागिरी : ठाकरे सरकारच्या महत्वकांक्षी शिवभोजन थाळीचं उद्धघाटन होवून एक दिवस उलटला नाही तोच बोगस लाभार्थ्यांचं ग्रहण या योजनेला लागलं आहे. रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात चक्क ठेकेदाराचीच माणसं कुपन घेत होती आणि याच योजनेच्या मेसमध्ये काम देखील करत होती. माणसं कमी असल्याने सुपरवाईझरनेच आपल्याला कुपन घ्यायला सांगितल्याचं ही माणसं सांगतात.

गोरगरिबांसाठी राज्य सरकारने शिवभोजन थाळी अगदी थाटामाटात सुरू केली. मात्र योजना सुरू झाल्याच्या दुस-याच दिवशी लाभार्थ्यांमध्ये गोलमाल पहायला मिळाला. विशेष म्हणजे ज्या कंपनीला हा ठेका देण्यात आलाय त्याच ठेकेदाराची माणसं या शिवभोजन थाळीचे लाभार्थी असल्याचं उघड झालं. रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रूग्णालयाचा शिवभोजन थाळीचा ठेका डीएम एंटरप्रायझेला देण्यात आला आहे. मात्र याच डीएम एंटरप्रायझेच्या दोन महिला कर्मचारी चक्क लाईनीत उभ्या राहून शिवभोजन थाळीचं कुपन घेत होत्या. निशा मांडवकर आणि शितल खेडेकर यांनी कुपन घेतल्यानंतर याच दोघी या ठिकाणी जेवण वाढण्याचं काम करताना पहावयास मिळाल्या आणि त्यानंतर याच दोन महिला कर्मचारी चक्क शिवभोजन थाळीच्या मेसमध्ये काम करताना पहायला मिळाल्या. मात्र ज्यावेळी आम्ही त्यांना बोलतं केलं त्यावेळी त्यांनी सुपरवायझर साहेबांनी सांगीतले म्हणून आम्ही कुपन घेतल्याची कबुली या बोगस लाभार्थ्यांनी दिली.