Home बातम्या फुलराणी सायना नेहवालने हाती घेतले कमळ, भाजपमध्ये केला प्रवेश

फुलराणी सायना नेहवालने हाती घेतले कमळ, भाजपमध्ये केला प्रवेश

0

नवी दिल्ली | फुलराणी म्हणून ओळखली जाणारी बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालने आज भाजपात प्रवेश केला आहे. सायना नेहवाल दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रचार करणार असल्याचे वृत्त आहे. ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आज तिने भाजपमध्ये प्रवेश केला. 29 वर्षांच्या सायना नेहवालपूर्वी रेसलर योगेश्वर दत्त आणि बबीता फोटागनेही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

सायना नेहवालचा जन्म हरियाणात झाला आहे. ती भारतातील यशस्वी खेळाडूंच्या यादीमध्ये आघाडीवर आहे. सायनाने ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदक पटकावले आहेत. 2015 मध्ये सायना नेहवाल जागतिक रॅकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर येणारी पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू ठरली होती. सध्या ती नवव्या क्रमांकावर आहे.