Home गुन्हा महागडया चारचाकी गाडीची काच फोडुन चोरी करणाऱ्या दोन सराईतगुन्हेगारांना खडक पोलिसांनी केले अटक

महागडया चारचाकी गाडीची काच फोडुन चोरी करणाऱ्या दोन सराईतगुन्हेगारांना खडक पोलिसांनी केले अटक

0

परवेज शेख : महागडया चारचाकी गाडीची काच फोडुन चोरी करणाऱ्या दोन सराईतगुन्हेगारांना अटक करण्यात खडक पोलीसांना यश अधिक माहिती अशी की, फिर्यादी नामे राजेश नामदेव वाळुज वय ३८ वर्ष धंदा शेती,व दुग्ध व्यवसाय रा. पाषाण पुणे हे आपले पत्नी सौ.वैशाली हिचे सोबत दिनांक २३/१/२०२० रोजी सांयकाळी ६:३० वा. बॉम्बे टाईल्स नेहरु रोड, सेव्हन लव्हज चौकाजवळ पुणे येथील दुकानामध्ये टाईल्स फरश्या पहाण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांनी त्यांची टोयोटो फॉर्म्युनर एम.एच.१४ ई.यु.५३२ ही सेव्हन लव्हज चौक नेहरु रोड भारतीय स्टेट बैंक शेजारी बॉम्बे टाईल्स चे समोर सार्वजनिक रोडवर लॉक व पार्क केली होती, टाईल्सच्या फरश्या पाहुन फिर्यादी व त्यांची पत्नी हे रात्री ८:४५ वा. सुमारास त्याचे गाडीजवळ आले असता, गाडीचे ड्रायव्हर सीटच्या पाठीमागील मधल्या दरवाज्याची काच फोडुन फिर्यादी यांचे पत्नीचे पर्स व त्यामध्ये असणारे ८,०००/- रुपये रोख रक्कम, आधारकार्ड, पॅनकार्ड, सिंडीकेट व कॅनरा बँकेचे ए.टी.एम.व इतर कागदपत्रे असा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेला होता.

खडक पोलीस स्टेशनचे कर्मचारी समीर माळवदकर व संदिप कांबळे यांना मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने इसम नामे १. किशोर नारायण ढवळे, वय २८ वर्षे, रा. १३, ताडीवाला रोड, भाजी मार्केट, भिमसेवा मित्र मंडळाचे मागे, पुणे २. मिथुन शिवदास कांबळे, वय २५ वर्षे, रा. १३, ताडीवाला रोड, भिम संघटना तरुण मंडळ चौक, मारुती मंदिरा जवळ, पुणे यांना विनय हायस्कुल धर्मपाल काशेवाडी, भवानी पेठ पुणे येथुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे, त्यांचे अटक दरम्यान त्यांनी चोरलेली व दाखल गुन्हयात वापरलेले , ३५,०००/- रु. किं. ची पांढ-या रंगाची होंडा अॅक्टीव्हा गाडी व ,४,७५०/- रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल त्यांचेकडुन जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई ही डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे ,श्रीमती. स्वपना गोरे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ व श्री. प्रदिप आफळे ,सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन चे श्री. भरत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.उत्तम चक्रे पोलीस निरीक्षक (गुन्हे) तपास पथकाचे प्रभारी सहा पोलीस निरीक्षक श्री. उमाजी राठोड, पोलीस कर्मचारी,अजिज बेग, विनोद जाधव, गणेश सातपुते, संदिप पाटील, राकेश क्षिरसागर, समीर माळवदकर, संदिप कांबळे, रोहन खैर, रवी लोखंडे, योगेश जाधव, विशाल जाधव, यांचे पथकाने केली आहे.