Home शहरे अहमदनगर नेवासा फाटा ते शेवगाव राज्यमार्ग दुरुस्तीच्या छञपती युवा सेनेच्या पाठपुराव्याला यश

नेवासा फाटा ते शेवगाव राज्यमार्ग दुरुस्तीच्या छञपती युवा सेनेच्या पाठपुराव्याला यश

0

नगर : नेवासा फाटा ते शेवगाव रस्ता दुरुस्ती करण्या बाबत छञपती युवा सेनेच्या आंदोलनाची दखल घेऊन संबंधित कार्यालयांनी कार्यवाही केल्याने छञपती युवा सेनेच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे,असे प्रदेश संघटक कमलेश नवले यांनी सांगितले. नेवासा ते शेवगाव राज्य मार्गवर नेवासा फाटा ते शेवगाव दरम्यान मोठमोठे खड्डे पडल्याने राज्यमार्ग दुरअवथ्या झाल्याने छञपती युवा सेनेने आवाज उठवून रस्ता दुरूस्ती साठी आंदोलन केले होते. यांची सार्वजनिक बांधकाम विभागचे उपअधिकारी अभियंता यांनी दखल घेत डांबर व खड्डी टाकून रस्तावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे.

नेवासा फाटा ते शेवगाव राज्यमार्ग जात असल्याने नेवासा फाटा ते कुकाणा या किमी च्या अंतरात गेल्या काही दिवसांपासून राज्य मार्गावर मोठमोठे असंख्य खड्डे पडल्याने वाहन धारकांना कसरत करावी लागत होती. खड्डे हुकविण्याच्या नादात अनेक अपघात घडत होते. त्यातच नजीकच्या काळात उस गळीत हंगाम सुरू आहे.सुमारे पाच ते साह साखर कारखान्याची ऊस वाहतूक याच मार्ग वरून होत असते.या मोठ्या वर्दळीच्या मार्गवर खड्डे पडल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत होती
छञपती युवा सेना प्रदेश संघटक कमलेश नवले व नरेंद्र नवथर प्रदेश उप अध्यक्ष यांनी रस्त्यावरील अपघात झालेल्या बांधकाम खात्याची प्रतीकात्मक प्रेतयाञा काढली आंदोलन केले होते. माञ सा,बां विभागाने या आंदोलनाचीही दखल घेतली नसल्याने प्रदेश संघटक कमलेश नवले यांच्या नेतृत्वाखाली छञपती युवा सेना शिष्टमंडळाने नेवासा सा, बां विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांना प्रत्यक्ष निवेदन देऊन खड्डे नाही बुजवल्यास सा,बां विभाग समोर दशक्रिया विधी आंदोलन करून प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत उपोषण करून करण्याच्या इशारा दिला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत नेवासा फाटा ते शेवगाव या राज्य मार्ग दरम्यान खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. नेवासा फाटा ते हिवरा खड्डे बुजविण्याचे काम अखेर पुर्ण झाले आहे. येत्या काही दिवसात हे काम पूर्ण केले जाणार आहे. अखेर छञपती युवा सेना च्या पाठपुराव्यात यश आले.