Home शहरे अहमदनगर राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्काराने सौंदाळा शाळेतील श्री रविंद्र पागिरे सर सन्मानित

राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्काराने सौंदाळा शाळेतील श्री रविंद्र पागिरे सर सन्मानित

0

नगर:(प्रतिनीधी कमलेश नवले)अहमदनगर येथील सह्याद्री उद्योगसमूहातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार सौंदाळा ता.नेवासा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रविंद्र पागिरे सर काल दिनांक 31 जाने2020 रोजी अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते पाचगणी (महाबळेश्वर) येथे वितरित करण्यात आला.
नयनरम्य आणि निसर्गरम्य अश्या पाचगणी येथील क्लाऊड मिस रिसॉर्ट येथे हा कार्यक्रम पार पडला.सौंदाळा शाळेत कार्यरत असताना आतापर्यंत त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत विद्यार्थी निवडले गेले आहेत त्याचप्रमाणे नवोदय विद्यालयासाठीही एक विद्यार्थिनींची निवड झाली आहे.याशिवाय विविध गुणदर्शन स्पर्धेत जिल्हा स्तरावर विद्यार्थी यशस्वी झाले आहेत,चला खेळूया अंतर्गत सुद्धा शाळेतील विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे.गणित विज्ञान प्रदर्शनात सुद्धा अभ्यासात खास मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी भागाकार यंत्र तयार केले असून त्या यंत्राची जिल्हा स्तर प्रदर्शनासाठी निवड झाली असून मुलांना त्याचा अभ्यासात उपयोग होत आहे.याशिवाय पंचायत समिती व जिल्हा परिषद तसेच राज्य स्तरावर देखील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम यापूर्वी त्यांनी केले आहे.शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना लेखनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने त्यांनी सर्व मुलांच्या साहाय्याने हस्तलिखित तयार करून त्याचे प्रकाशन केले आहे.यापूर्वी वर्षांपूरविच ग्लोबलनगरी सारखा उपक्रम सौंदळा शाळेत राबविला आहे. गट स्तरावरील बालमेळाव्यात सौंदाळा शाळेतील मुलांनी सामान्यज्ञान वर आधारित जॅक पॉट बनवला होता.
यापूर्वीही त्यांना समृद्धी ग्रामविकास प्रतिष्ठान तर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
याबद्दल त्यांचे सौंदाळा गावातील सर्व नागरिक, ग्रामस्थ,सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच शरदराव आरगडे, उपसरपंच बाळासाहेब बोधक, सचिन आरगडे, रामकिसन चामुटे,बबन आरगडे रेवननाथ आरगडे, कानिफ आरगडे, जगन्नाथ अढागळे, सुनिल आरगडे,मारुती आरगडे यांच्या कडून अभिनंदन करण्यात आले आहे.
या बद्दल श्री पागिरे सरांशी बोललो असता यापुढेही माझ्या सौंदाळा शाळेत असेच नवनवीन उपक्रम राबविणार असून माझ्या या यशात माझे सहकारी,आदर्श शिक्षक श्री कल्याण नेहुल सर,अशोक पंडित सर,राजेश पठारे सर,श्रीम कल्पना साठे मॅडम,कल्पना निघुट मॅडम व मुख्याध्यापक श्री घुले सर यांचीही तितकीच महत्वाची भूमिका आहे.तसेच या यशात माझे कुटुंबीय,सौंदाळा गावातील ग्रामस्थ,सरपंच आणि सर्व सदस्य यांचेही योगदान महत्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.