Home ताज्या बातम्या स्कूल बसचा भीषण अपघात, 3 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक

स्कूल बसचा भीषण अपघात, 3 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक

0

नाशिक : मनमाड पासून जवळ गांधींच्या खळ्या जवळ कांचन सुधा शाळेत लहान मुलांना घेऊन जाणारी मॅजिक गाडीचा अपघात झाला. गाडीने तीन पलटी घेतल्या. गाडीमध्ये 8 ते 10 विद्यार्थी होते. त्यापैकी 3 विद्यार्थी गंभीर जखमी झाले. त्यांना मालेगावच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

अपघातानंतर संस्था चालकाने गाडी पळवून नेली आणि शाळेमागे लपवून ठेवली. पंचनामा होणे गरजेचे असतांना गाडी नेण्यात आली असून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.