Home बातम्या आंतरराष्ट्रीय चीनमधील 324 भारतीय दिल्लीत परतले

चीनमधील 324 भारतीय दिल्लीत परतले

0

नवी दिल्ली : चीनमधील वुहान येथील 324 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान आज सकाहभ्‌ दिल्लीत पोहचले आहे. चीनमध्ये करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. या गंभीर परिस्थितीतून चीनमधील भारतीयांची सुटका करण्यासाठी एअर इंडियाने एक विशेष विमान वुहानला पाठवले होते.

एअर इंडियाने पाठवलेल्या विशेष विमानातून 324 भारतीय दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. ज्यानंतर हे विमान दिल्लीत सकाळी सुमारे साडे सात वाजता पोहचले आहे. यात 211 विद्यार्थी, 110 कामगार आणि 3 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या नागरिकांना भारतात आणल्यावर तातडीने घरी पाठवण्यात येणार नाही.

या सगळ्या रुग्णांसाठी भारतीय लष्कराने हरयाणा येथील मानेसरमध्ये तात्पुरते रुग्णालय उभारले आहे. या ठिकाणी 300 जणांची राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. चीनमधून येणाऱ्या नागरिकांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या सगळ्यांना मानेसर येथे डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाणार आहे.

करोना व्हायरसचा भारतातला पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला. एका विद्यार्थ्याला या व्हायरसची लागण झाली. हा विद्यार्थी वुहान येथून परतला होता. त्याला आता वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. ही घटना समोर आल्यानंतर एक विशेष विमान चीनमधील वुहानला पाठवलं होतं. या विमानातून 324 भारतीय हे आज दिल्लीत दाखल झाले आहेत.