Home ताज्या बातम्या पुणे शहरात गुरुवारी पाणी बंद शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा

पुणे शहरात गुरुवारी पाणी बंद शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा

0

पुणे :पुणे शहरात पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे जलशुद्धीकरण केंद्रांचे, नवीन होळकर पंपिंग विषयक कामे करण्यात येणार असल्याने संपूर्ण पुणे शहरात गुरुवारी (दि. 6 फेब्रुवारी) पाणी बंद राहणार आहे व, शुक्रवारी (दि. 7 फेब्रुवारी) सकाळी आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.व पाणी पुरवठा बंद असणारा भाग पर्वती जलकेंद्र भाग ( पर्वती , पद्मावती , इंदिरानगर पंपींग ) – शहरातील सर्व पेठा , दत्तवाडी परीसर , राजेंद्रनगर , लोकमान्य नगर , डेक्कन परिसर , शिवाजी नगर परिसर , स्वारगेट परिसर , पर्वती दर्शन , मुकुंद नगर , पर्वती गाव , सहकार नगर , सातारा रोड परीसर , पद्मावती , बिबवेवाडी , तळजाई , कात्रज , धनकवडी , इंदिरानगर परीसर , कर्वे रोड ते एस . एन . डी . टी . परीसर , एरंडवणा , संपूर्ण कोथरूड परिसर , डहाणूकर कॉलनी , कर्वेनगर , लॉ कॉलेज रोड , सेमिनरी झोन वरील मिठानगर , शिवनेरी नगर , भाग्योदय नगर , ज्ञानेश्वर नगर , साईबाबा नगर , सर्व्हे नं ४२ , ४६ ( कोंढवा खुर्द ) इत्यादी परीसर , पर्वती टँकर भरणा केंद्र , पद्मावती टँकर भरणा केंद्र . वडगाव जलकेंद्र परीसर : – हिंगणे , आनंदनगर , वडगाव , धायरी , आंबेगावपठार , दत्तनगर , धनकवडी , कात्रज , भारती विद्यापीठ परीसर , कोंढवा बुद्रुक इत्यादी . चतुःशृंगी / एस . एन . डी . टी / वारजे जलकेंद्र परीसर : – पाषाण , औंध , बोपोडी , खडकी , चतुःश्रृंगी परिसर , गोखले नगर , जनवाडी , रेंजहिल्स , बावधान , बाणेर , चांदणी चौक इ . परिसर किष्किंदा नगर , रामबाग कॉलनी , डावी उजवी भुसारी कॉलनी , धनंजय सोसायटी , एकलव्य कॉलेज परीसर , महात्मा सोसायटी , गुरू गणेशनगर , पुणे युनिर्व्हसिटी परीसर , वारजे हायवे परीसर , वारजे माळवाडी , रामनगर , अहिरेगाव , पॉप्लयुलर नगर , अतुल नगर , शाहु कॉलनी , वारजे जलशुध्दीकरणाचा परीसर , औंध बावधन , सुस , सुतारवाडी , भुगाव रोड परीसर इत्यादी . लष्कर जलकेंद्र भाग : – लष्कर भाग , पुणे स्टेशन परीसर , मुळा रस्ता , कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता , रेसकोर्स परीसर , वानवडी , कोंढवा , हडपसर , महंमदवाडी , काळेपडळ , मुंढवा , येरवडा परीसर , विश्रांतवाडी , नगर रस्ता , कल्याणी नगर , महाराष्ट्र हौसींग बोर्ड कॉलनी , वडगाव शेरी , चंदन नगर , खराडी , सोलापूर रस्ता , गोंधळे नगर , सातववाडी इत्यादी . नवीन होळकर पंपींग भाग : – विद्यानगर , टिंगरे नगर , कळस , धानोरी , लोहगाव , विश्रांतवाडी , विमाननगर , नगर रोड परीसर इत्यादी बंद राहणार आहे