Home गुन्हा विवाहित महिलेवर अत्याचार….पती पत्नी वर गुन्हा दाखल..

विवाहित महिलेवर अत्याचार….पती पत्नी वर गुन्हा दाखल..

0

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील बाबा छत्रे याने शेतात काम करण्यास येणाऱ्या महिलेला, पत्नीच्या मदतीने अत्याचार करत मुलींना तसेच नवऱ्याला मारून टाकण्याची धमकी दिल्याची फिर्याद श्रीगोंदा पोलिस ठाण्यात मंगळवार दि.४ रोजी दाखल करण्यात आली.
तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील २७ वर्षीय महिला आपल्या कुटुंबाची गुजराण करण्यासाठी गावातील महिलांबरोबर पाच वर्षांपूर्वी लोणी व्यंकनाथ येथील शेतकरी बाबा छत्रे याच्या शेतात काम करण्यासाठी जात होत्या. तेथे काम करत असताना बाबा छत्रे याला दोन मुली असल्याने तो मुलासाठी तो सतत त्याच्या पत्नीला दुसरे लग्न करण्याची धमकी देत आहे व यातून त्याची पत्नी तणावात असल्याची माहिती छत्रे याच्या पत्नीने पारगाव येथील पिडीत महिलेला सांगून नवऱ्याशी मैत्री करण्याचा सल्ला पीडितेला दिला. तसेच त्याच्या सोबत बोलत जा.त्याला फोन करत जा असेही तिला सांगितले.यानंतर पिडीत महिला २०१८ साली गावातील महिलांसोबत बाबा छत्रेच्या शेतात कामा साठी रोजंदारीवर गेली. त्यावेळी छत्रे याच्या पत्नीने पिडीत महीलेसमवेत आलेल्या महिलांना जाणीव पूर्वक दुसऱ्या शेतात कामासाठी नेले. व तिला शेतात फुटलेल्या पाईपचे काम करण्यासाठी पती बरोबर पाठविले. तिला एकटी पाहून छत्रे याने पीडिते सोबत अश्लील चाळे केले. यावेळी पीडितेने त्याला विरोध केला व एक लहान मुलगी असल्याचे सांगितले. तरीही छत्रे याने तिचे काहीही ऐकून न घेता जबरदस्तीने शरीरसंभोग केला. बदनामी होईल म्हणून हे प्रकरण पीडितेने कोणाला न सांगता शेतात कामावर जाणे सोडून दिले. कामावर येत नसल्याने छत्रे याने पीडितेला वारंवार फोन केले व झालेला सर्व प्रकार घरच्यांना सांगत तुझी बदनामी करून संसाराचे वाटोळे करेल अशी धमकी दिली. भीतीपोटी एक महिन्यानंतर पुन्हा ही महिला छत्रेच्या शेतात कामावर गेली. तेव्हा बाबाने पुन्हा तिच्याबरोबर जबरदस्ती करीत अत्याचार केल्याने पिडीत महिला छत्रे याच्या शेतात १ वर्ष कामासाठी गेली नाही. त्यामुळे दि. २ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजे च्या दरम्यान बाबा छत्रे हा थेट तिच्या घरी पारगाव सुद्रिक येथे पोहोचला. तेथे त्याने या पिडीत महिलेला मला फोन करत जा, तू मला आवडतेस, तुझ्या नवऱ्याने तुला सांभाळले नाही तर मी तुला सांभाळेन. नाहीतर तुझ्या दोन्ही मुलींना मारून टाकीन व नवऱ्याला किडण्याप करील. अशी धमकी दिल्याने पीडित महिलेने बाबासाहेब छत्रे व त्याच्या पत्नीच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादवरून बाबा छत्रे व त्याची पत्नी यांच्यावर भा.द.वि कलम ३७६ व १०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.