Home गुन्हा जुगार अड्डावर पुणे पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई,

जुगार अड्डावर पुणे पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई,

0

पिंपरी चिंचवड: चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरूद्वारा रोडवरील झोपडपट्टीपाठीमागे पत्रा शेडमध्ये पत्याच्या जुगार अड्ड्यावर पुणे पिंपरी चिंचवड पोलिसांनी जुगार अड्डावर धाड घातली. त्यात ५ जणांना अटक करण्यात आली आहे.गुरूद्वारा रोडवरील झोपडपट्टीपाठीमागे पत्रा शेडमध्ये पत्यांचा जुगार अड्डा सुरु असल्याची गोपनीय माहिती माहिती पोलिसांना मिळाली होती व अड्यावर स्थानिक पोलिसांनी कारवाई केली. मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या मटका अड्ड्यावरून पोलिसांनी ६ हजार २० रुपये जप्त केले असून पाच जणांवर कारवाई केली आहे.चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरूद्वारा रोडवरील झोपडपट्टीपाठीमागे पत्रा शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर जुगार, मटका अड्डा सुरु असल्याच्या तक्रारी अनेकदा केल्या गेल्या आहेत. मात्र या ठिकाणावर कारवाई होत नव्हती. या ठिकाणी मटका सुरु असल्याची माहिती वरिष्ठांना मिळाली. त्यानंतर या अड्डयावर स्थानिक पोलिसांनी छापा मारला.त्यावेळी तेथून पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली.या ठिकाणी सुरू असलेला अड्डा हा मटका किंग ‘पप्पू’ याचा आहे. मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या ठिकाणी कारवाई केल्यानंतर हा मटका किंग फरार झाला आहे. ही करावाई पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमराव शिंगाडे, सहायक निरीक्षक अभिजित जाधव, रोहिणी शेवाळे आणि त्यांचे पथक यांनी केली.