Home गुन्हा मयत विश्वस्त जिवंत भासवून तीन एकर जमीन हडपली….. तत्कालीन नायक तहसीलदारांसह २४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल……

मयत विश्वस्त जिवंत भासवून तीन एकर जमीन हडपली….. तत्कालीन नायक तहसीलदारांसह २४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल……

0

श्रीगोंदा : मयत ट्रस्टीच्या जागी बनावट लोक उभे करून मयत ट्रस्टी जिवंत दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे कै.अंजनाबाई भिकाजीराव ढमढेरे ट्रस्टची श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी बु. येथील एकूण ३ एकर ९ गुंठे जमीन हडपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ट्रस्टचे सचिव चंद्रकांत काशीनाथ ढमढेरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तत्कालीन नायब तहसीलदार, तत्कालीन सबरजिस्टर यांच्यासह साक्षीदार, तत्कालीन तलाठी, मंडलाधिकारी अशा एकूण २४ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मंगळवारी दि ४ दाखल करण्यात आला. हा प्रकार दि ३०/११/२०१५ ते दि १७/६/२०१६च्या दरम्यान घडला.
याप्रकरणी ढमढेरे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, गौतमचंद पुनमचंद बाठिया (रा. माणिकनगर, स्टेशनरोड अ नगर), सुभाष अर्जुन पवार (रा. बेलवंडी शुगर, नायब तहसीलदार)(दि३०/११/१५रोजी पदावर असणारे),महेश खेतमाळीस रा. श्रीगोंदा(साक्षिदार),विजय मोरे रा श्रीगोंदा (साक्षिदार),रामदास थोरात रा लोणीव्यंकनाथ (साक्षिदार),राजू कोरे रा मढेवडगाव (साक्षिदार),चंद्रकांत शिनलकर रा श्रीगोंदा (व्यवस्थापक बालाजीनागरी पतसंस्था),अन्सार शेख रा श्रीगोंदा(साक्षीदार),अभिजित रेपाळे रा पारगाव सुद्रीक ता श्रीगोंदा (साक्षिदार),अजित काकडे रा. लोणी व्यंकनाथ(खरेदी घेणार),रामदास शेलार रा बेलवंडी (साक्षिदार),सतीश लगड रा.कोळगाव(साक्षिदार), किशोर पवार रा बेलवंडी स्टेशन(साक्षिदार),नाना सय्यद रा रेल्वे स्टेशन,श्रीगोंदा(ओळख देणार), मोहन डांगे रा श्रीगोंदा कारखाना(ओळख देणार),सचिन भडांगे(म्यानेजर श्रीगोंदा-आयडीबीआय बँक),बी.डी. पानसरे (कामगार तलाठी,बेलवंडी), हमशोद्दीन शेख(मंडलाधिकारी बेलवंडी),पांडुरंग निंभोरे रा. घोटवी (ओळख देणार), विलास म्हस्के रा श्रीगोंदा, राजेंद्र क्षीरसागर रा श्रीगोंदा, अजित ओसवाल(आयडीबीआय बँक,श्रीगोंदा), श्रीगोंदा सबरजिस्टर (३/१२/१५ रोजी पदावर असणारे), अशा २४ जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी ढमढेरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे, या सर्व लोकांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ट्रस्टी मयत आहेत हे माहिती असून सुद्धा मयत ट्रस्टीच्या जागी खोटे लोक उभे करून बनावट बेकायदेशीर दस्तऐवज तयार करून बनावट ओळखपत्र,बोगस सह्या व अंगठ्याच्या आधारे सदर ट्रस्टची गट नं ७२८ मधील जमीन बळकावून फिर्यादी व ट्रस्टची फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे.या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव करत आहेत.