पुणे: गिझरमधून गॅस लीक झाला. यामुळे तरुणाचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. गिझरमधून बाहेर पडलेल्या वायूमुळे 30 वर्षीय दगावला. कोथरूड भागातील एका सोसायटीमध्ये बुधवारी हा प्रकार उघड झाला. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने घराचा आणि बाथरूमचा दरवाजा तोडून या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. या बाबत कोथरूड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रामराजे किशोर संकपाळ (वय 30) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
- Advertisement -
























WhatsApp