पुणे : शाळेच्या आवारात वारंवार का येता याचा जाब विचारला म्हणून शाळेच्या समोर तीन माथेफिरुंनी शिवीगाळ करत शिक्षकांना काठीने दगडाने मारहाण केली. पुण्याजवळील आष्टापूर गावातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ही घटना घडली. अनिल कुंजीर आणि इतर दोन शिक्षक शाळा सुटल्यानंतर कारमधून घरी जात होते. दरम्यान घरी जाताना रस्तात गाडी आडवून गाडीतून उतरुन पुन्हा मारहाण करण्यात आली.
विकास तरंगे, महेंद्र गाडे आणि सचिन कांबाळे असे मारहाण करणाऱ्या आरोपीची नावे आहेत. तिघांवर उरळी कांचन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ आज आष्टापूर मधील शाळेत निषेध सभा आयोजित करण्यात आली आहे.