Home शहरे नागपूर पीडितेची प्रकृती स्थिर मात्र चिंताजनक, मेडिकल बुलेटीन जारी

पीडितेची प्रकृती स्थिर मात्र चिंताजनक, मेडिकल बुलेटीन जारी

0

नागपूर : वर्ध्यामधील हिंगणघाट येथील प्राध्यापक तरुणीला सोमवारी सकाळी एका तरुणाने जिवंत जाळले. ती सध्या नागपूरमधील ऑरेंज सिटी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. पीडितेची प्रकृती स्थिर मात्र चिंताजनक आहे. उद्या पीडित मुलीची सर्जरी करण्यात येणार आहे. तरुणीने अजून डोळे उघडलेले नाहीत. सध्या पीडिता ICU मध्ये आहे.

तरुणीचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. कॉम्प्लिकेशन वाढू शकतात. यासोबतच संसर्ग होण्याची शक्यता आहे. उद्या ड्रेसिंग करण्यात येणात आहे. तसेच आज रक्त देणार आहे. प्रोटीनचा लॉस नको म्हणून औषधे देण्यात येत आहेत. दरम्यान तरुणीच्या घशावरील सूज आता कमी झाली आहे.

सोमवारी सकाळी साडे सात वाजता लगबगीने महाविद्यालयाकडे निघाली होती. या 24 वर्षीय प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भररस्त्यात पेटवून दिले. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे ही संतापजनक घटना घडली. तरुणीला पेटवल्याचे पाहताच काही शाळकरी मुलींनी आरडाओरड करत जवळपासच्या मदतीची याचना केली. त्या वेळी धावत येऊन नागरिकांनी तत्काळ तरुणीच्या अंगावर पाणी ओतून आग विझवली. या घटनेमध्ये ही तरुणी 40 टक्के भाजली असून नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात ती मृत्यूशी झुंज देत आहे.