Home गुन्हा कार अंगावर का घातली असा जाब विचारणाऱ्या डॉक्टरचे डोळे काढले, आरोपी अटकेत

कार अंगावर का घातली असा जाब विचारणाऱ्या डॉक्टरचे डोळे काढले, आरोपी अटकेत

0

पुणे: किरकोळ कारणावरुन जाब विचारणाऱ्या डॉक्टरावर हल्ला करुन डोळे काढण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. आरोपींना याप्रकरणी हडपसर पोलीसानी अटक केली आहे. योगेश हाणमने, रितेश जाधव आणि अविनाश गायकवाड असे अटक आरोपींचे नाव आहेत.

शनिवारी पुणे विमानतळावर बहिणीला सोडवून परत हडपसरकडे दुचाकिवरुन येणाऱ्या सतिश वानखेडे, अक्षय जाधव हे कोरेगाव पार्क- मुंढवा चौकातील रोडवरुन जात होते. यावेळी आचानक एक कार अंगावर आली. दरम्यान त्यांना दुचाकी वरील डॉक्टर वानखेडे यांनी जाब विचारला. परंतु चिडून कारमधील चौघांनी दुचाकीवरील वानखेडे आणि जाधव यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. या चौघांनी गाडी आडवी करत सतिश वानखेडे यांना मारहाण करण्यस सुरवात केली. त्यापैकी एकाने धारधार शस्त्राने अंगावर, पाठीवर आणि डोळ्यावर वार केले. यानंतर आरोपी फरार झाले. मात्र यानंतर 24 तासांच्या आत पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.