Home ताज्या बातम्या पंढरपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अनिल अभंगराव यांची बिनविरोध निवड

पंढरपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अनिल अभंगराव यांची बिनविरोध निवड

0

पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष लतिका डोके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने उपनगराध्यक्षपद रिक्त झाले होते. या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडली. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी परिचारक गटाचे अनिल अभंगराव यांची निवड करण्यात आली. यावेळी सत्ताधारी पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीकडून नगरसेवक अनिल अभंगराव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आसल्याची घोषणा नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी केली.

आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या या निवडीमुळे इतर मागासवर्गीय समाजास आकर्षित करण्याचे काम सत्ताधारी परिचारक गटाकडून केल्याचे दिसत आहे. यावेळी पिठासन अधिकारी म्हणून नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांनी काम पाहिले तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी काम पाहिले.

यावेळी पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष साधनाताई भोसले, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, नगरसेवक सुजीतकुमार सर्वगोड, विक्रम शिरसट, संजय निंबाळकर, गुरुदास अभ्यंकर, विवेक परदेशी, लतिका डोके, डी.राज सर्वगोड, रेणुका घोडके उपस्थित होते.