Home ताज्या बातम्या बेवारस बॅगेत बाॅम्ब असल्याच्या अफवेनं जालन्यात खळबळ

बेवारस बॅगेत बाॅम्ब असल्याच्या अफवेनं जालन्यात खळबळ

0

जालना :बेवारस बॅकेत बॉम्ब असल्याच्या अफवेनं जालन्यात एकच खळबळ उडाली. शहरातील सत्कार काॅम्लेक्सच्या समोर एक बेवारस बॅग असून त्यात बाॅम्ब असल्याचा संशय असल्याचा फोन पोलिसांना आला. त्यानंतर पोलीस आणि बाॅम्ब नाशक पथकानं घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक आणि बाॅम्ब स्कॅनरच्या मदतीनं बॅग तपासण्यात आली. बॅगेत कोणतंही स्फोटक पदार्थ नसल्याची खात्री पटल्यानंकर पथकानं संपूर्ण बॅग चेक केली. दरम्यान, या बॅकेत एका लहान मुलाचे शालेय साहित्य आढळून आलं. मात्र, या बॅगेमुळं शहरात काही वेळ घबराहटीचं वातावरण निर्माण झालं होतं.