Home ताज्या बातम्या डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल हॉस्पिटला प्रथम क्रमांकाचा ग्रीन हॉस्पिटल पुरस्कार प्रदान

डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल हॉस्पिटला प्रथम क्रमांकाचा ग्रीन हॉस्पिटल पुरस्कार प्रदान

0

परवेज शेख डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल हॉस्पिटला प्रथम क्रमांकाचा ग्रीन हॉस्पिटल पुरस्कार प्रदान

पिंपरी – असोशिएशन ऑफ हेल्थ केअर प्रोव्हायडर्स, दिल्ली यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या सर्वेक्षणात पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल हॉस्पिटल व संशोधन केंद्राला प्रथम क्रमांकाचा ग्रीन हॉस्पिटल पुरस्कार प्रदान करण्यात आला. दि. ७ फेब्रुवारी २०२० रोजी बंगलोर येथील हॉटेल ललित अशोक येथील सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री श्री सदानंद गौडा यांच्या हस्ते डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी ग्रीन हॉस्पिटल हा पुरस्कार सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत स्वीकारला. यावेळी असोशिएशनचे अध्यक्ष डॉ अलेक्सझेंडर थॉमस, डायरेक्ट जनरल डॉ गिरीधर ग्यानी तसेच डॉ. डी. वाय.पाटील हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.एच.एच.चव्हाण उपस्थित होते.

असोशिएशन ऑफ हेल्थ केअर प्रोव्हायडर्सच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध संस्थांचा यात समावेश होता. ग्रीन हॉस्पिटल सर्वेक्षणात डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल हॉस्पिटल व संशोधन केंद्राला प्रथम क्रमांक मिळाला. करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात रुग्णालय व परिसरातील वृक्षाचे जतन संवर्धन, पर्यावरण पूरक साधनांचा वापर, पाण्याचे योग्य नियोजन व शुद्धीकरण, पुनः वापर, सौरऊर्जा प्रकल्प, खतनिर्मिती प्रकल्प, आधुनिक यंत्रणेतून विजेची बचत, प्लास्टिक बंदी, प्रदूषण मुक्त वाहनाचा वापर, स्वच्छता, देखभाल, संसर्ग नियंत्रण, जैववैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन, निर्जंतुकीकरण प्रक्रिया, जनजागृती, भिंतीचित्रांद्वारे संदेश फलक आदी प्रमुख घटकांचे सर्वेक्षणात समावेश करण्यात आला होता.

उपाध्यक्षा डॉ भाग्यश्रीताई पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, संचालिका डॉ. स्मिता जाधव, ट्रस्टी व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील, अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर यांनी हॉस्पिटल मधील पुरस्कारासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी यांचे कौतुक केले.

“आंतरराष्ट्रीय पातळी वरील ग्रीन हॉस्पिटल पुरस्कार आमच्या हॉस्पिटला मिळणे ही फार अभिमानाची बाब आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल पिंपरी, पुणे हे पर्यावरण पूरक घटकांची अंमलबजावणी करीत आधुनिक ऊर्जा संसाधन वापरा बरोबर ऊर्जा बचतीला तसेच पर्यावरण जतन व संवर्धनाला प्रोत्साहन देत आहे. हा पुरस्कार आज मिळाल्याने अधिकच आनंद होत आहे. मिळालेली ही कौतुकाची थाप अधिकच उत्साह वाढविणारी आहे. यातूनच पुढे काम करायला प्रोत्साहन मिळाले आहे. ग्रीन हॉस्पिटल हा पुरस्कार मिळविण्यात सर्वांचेच योगदान फार महत्त्वाचे आहे” असे प्रतिपादन कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी केले.

या संपूर्ण मोहिमेत डॉ. पी. डी. पाटील व डॉ भाग्यश्रीताई पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

फोटोतील तपशील – केंद्रीय मंत्री श्री सदानंद गौडा पुरस्कार प्रदान करताना स्वीकारताना कुलपती डॉ पी डी पाटील, डॉ.एच.एच.चव्हाण सोबत एअर मार्शल टी डी जोसेफ, असोशिएशनचे अध्यक्ष डॉ अलेक्सझेंडर थॉमस