Home गुन्हा उस्मानाबाद-सोलापूर महामार्गावर टँकर पेटला; सिलेंडरचे स्फोट, वाहतूक बंद

उस्मानाबाद-सोलापूर महामार्गावर टँकर पेटला; सिलेंडरचे स्फोट, वाहतूक बंद

0

उस्मानाबाद : उस्मानाबाद-सोलापूर महामार्गावर तामलवाडीजवळ गॅस टँकरने पेट घेतल्याने एकामागून एक सिलेंडरचे स्फोट झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली असून खबरदारीचा उपाय म्हणून तामलवाडीची काही घरे रिकामी केली आहेत. कोणतीही जीवित हानी नाही, ग्रामस्थ एकमेकांना मदत करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे उस्मानाबाद-सोलापूर महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे.