Home गुन्हा सराईत वाहनचोरांना फरासखाना पोलीसांकडुन अटक

सराईत वाहनचोरांना फरासखाना पोलीसांकडुन अटक

0

पुणे : परवेज शेख पुणे, दि. ११ जानेवारी : दोन सराईत वाहनचोरांना फरासखाना पोलीसांकडुन अटक मिळालेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलीस स्टेशन तपास पथकाचे प्रभारी अधिकारी व तपास पथकातील कर्मचारी पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस कर्मचारी शंकर कुंभार यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की इसम नामे १) संतोष विष्णू नागरे वय -२५ वर्षे, २) सागर शरद समगीर वय-२८ वर्षे, हे चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी नाना पेठ येथे येणार आहेत.त्यानुसार दुध भट्टी गणेश पेठ येथे सापळा लावून नमूद इसमांना शिताफीने पकडून त्यांच्याकडे आज तागायत तपास करता त्यांनी पुणे शहर व ग्रामीण परिसरातुन अंदाजे किंमत रुपये १४,००,०००/- चर एकूण २० दुचाकी वाहने चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरची वाहने १) फरासखाना २) विमानतळ ३) हङपसर ४) कोंढवा ५) विश्रांतवाङी ६) सासवङ लोणीकंद पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुहन्यातील निष्पन्न झाली आहेत तसेच इतर वाहनांबाबत तपास चालू आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, डॉ. श्री. संजय शिंदे सो. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ पुणे श्रीमती स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे श्री प्रदिप आफळे यांचे मार्गदर्शनाखाली यांचे श्री जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक फरासखाना पोलीस स्टेशन पुणे, दादासाहेब गायकवाड पोलीस निरीक्षक (गुन्हे) फरासखाना पोलीस स्टेशन पुणे, पोलीस उपनिरिक्षक प्रमोद हंबीर,यशपाल सुर्यवंशी, पोहवा बापु खुटवड, सयाजी चव्हाण, केदार आढाव, पोलीस नाईक शंकर कुंभार, विकास बो-हाडे,अमोल सरडे, दिनेश भांदुर्गे,महाविर वलटे, हनीफ शेख,विशाल चौगुले, आकाश वाल्मिकी, अमेय रसाळ, मयुर भोकरे, मोहन दळवी, पंकज देशमुख यांनी केली आहे.