Home ताज्या बातम्या गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक पेटला ,पेटत्या सिलेंडरांच्या थराराने लोक भयभीत

गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक पेटला ,पेटत्या सिलेंडरांच्या थराराने लोक भयभीत

0

तामलवाडी टोल नाक्या जवळील भीषण घटना

उस्मानाबाद , प्रतिनिधी : सोलापूर येथून उस्मानाबाद येथील एका गॅस वितरण एजन्सी कडे एलपीजी गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने ट्रकसह सर्व सिलेंडर अक्षरशः जळून खाक झाले आहेत. ट्रक मधील एक एक सिलेंडर बॉम्बस्फोट झाल्याप्रमाणे मोठ्या अवजासह फुटत होते आणि आगीच्या ज्वालानी आसमंत दणाणून सोडत होते. हा थरार तुळजापूर ते सोलापूर रस्त्यावरील तामलवाडी टोलनाक्याजवळ मंगळवारी (११ फेब्रुवारी) सायंकाळी सातच्या सुमारास घडला.

सोलापूर येथील डेपोतून जवळपास साडेतिनशे पेक्षा अधिक एलपीजी गॅस सिलेंडर घेऊन सायंकाळच्या सुमारास एक ट्रक (एम एच २५ यु ११७७) निघाला. तो सोलापूर – तुळजापूर मार्गावरील तामलवाडी येथील टोलनाक्याजवळ सायंकाळी सातच्या सुमारास येताच ट्रकमधील सिलेंडर्सनी पेट घेतला. मग एका मागून एक सिलेंडर्सचे मोठमोठे स्फोट होत होते. आणि आगीच्या ज्वालानी आणि मोठ्या आवाजांनी आसमंत दणाणून जात होता. हा थरार अग्नीशमन दलाने आग आटोक्यात आने पर्यंत अक्षरशः चालूच होता. घटनास्थळी तामलावडी पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. घटनेची चौकशी चालू आहे.

दरम्यान ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले होते. मात्र यात कसलीही जीवितहानी झाली नसल्याने लोकांचा जीव भांड्यात पडला आहे.