Home शहरे जळगाव ग्राहक हक्कांबरोबरच कर्तव्याचीही जाणीव ठेवा – विकास महाजन

ग्राहक हक्कांबरोबरच कर्तव्याचीही जाणीव ठेवा – विकास महाजन

0

डी.डी.एस.पी.महाविद्यालय एरंडोल च्या विद्यार्थ्यांना दिला कानमंत्र
प्रतिनिधि – एरंडोल
हक्कांची जाणीव प्रत्येकालाच असते,मात्र त्याचबरोबर कर्तव्याचीही जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे.असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील सदस्य तथा ग्राहक पंचायतीचे जिल्हाअध्यक्ष विकास महाजन यांनी दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला,वाणीज्य व विद्यान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यां समोर केले.महाविद्यालयाच्या वाणीज्य विभाग आणि अर्थशास्त्र विभागातर्फे “ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहक जागृती ” या विषयावर व्याख्यान आयोजित केलेले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी.डी.एस.पी.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.आर.पाटील होते.विशेष अतिथि म्हणुन अ.भा.ग्राहक पंचायत जिलाध्यक्ष विकास महाजन, जिला प्रतिनिधि शोभा साळी, तालुका अध्यक्षा आरती ठाकुर, महिला अध्यक्षा मिनाक्षी पाटील,प्रा.शोभना कोळी होते.प्रास्तावीक डॉ.आर.एस.वानखेड़े यानी केले.तर सूत्रसंचालन प्रा.व्ही.के गाढ़े यानी व आभार प्रा.शोभना कोळी यानी मानले.प्राचार्य डॉ.ए.आर.पाटील यांनी ही ग्राहक हितासंबंधी मार्गदर्शन केले.


कार्यक्रमास महाविद्यालयाचे समन्वयक डॉ प्रा.ए.ए.बडगुजर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख राम वानखेड़े, जितेंद्र महाजन व १३० विध्यार्थी उपस्थित होते,स्वागत गीत कु.अश्विनी व कु.रोशनी जाधव यानी सादर केले.यांच्यासह एरंडोल अ.भा.तालुका ग्राहक पंचायती चे पदाधिकारी डॉ.प्रशांत पाटील, पत्रकार कुंदनसिंह ठाकुर, शालीनी कोठातवदे,डॉ. राखी काबरा, सुशीला सोनार,प्रा.डॉ. मीना काळे, निलीमा मानुधने,पूजा साळी, इंदिरा साळी, सारिका पाटिल, मालती पाटिल आदी उपस्थीत होते.
फोटो ओळी – एरंडोल येथे महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात बोलतांना विकास महाजन सोबत प्राचार्य डॉ.ए.आर.पाटील,प्रा.शोभना कोळी,आरती ठाकुर व मीनाक्षी पाटील आदी.