Home गुन्हा देशी बनावटीचे पिस्टल बाळगणार्‍या अटक

देशी बनावटीचे पिस्टल बाळगणार्‍या अटक

0

परवेज शेख राष्ट्रपतींच्या पुणे दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हेगारांची झाडाझडती घेत असताना आरोपी विनीत सुर्यकांत बिरादार उर्फ रेड्डी वय-१९, रा.भेकराई जकातनाका फुरसुंगी (मुळगाव : ठोणगाव ता.उदगीर जि.लातूर) हा देशी बनावटीचे पिस्टल बाळगत असल्याची माहिती हडपसर तपास पथकातील सहा.पो.नि. चव्हाण, पो.शि.नितीन मुंढे, अकबर शेख यांना मिळाली. त्यानुसार तपास पथकातील कर्मचार्‍यांनी कालिका मंदिर, काळेपडळ येथून सदर आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस असा एकूण १०,६००/- रुपयांचा मुद्देमाल सापडला. त्यास आर्म ऍक्ट खाली अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपी रेड्डी याच्यावर यापूर्वी देखील हडपसर येथे शरिराविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास सपोनि चव्हाण करित आहेत.

सदर कामगिरी वरिष्ठांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे, गुन्हे निरीक्षक हमराज कुंभार, सपोनि संजय चव्हाण, हवा. युसुफ पठाण, संपत औचरे, राजेश नवले, पो.ना. प्रताप गायकवाड, विनोद शिवले, सदौबा भोजराव, गणेश दळवी, गोविंद चिवळे, पो.शि. नितीन मुंढे, अकबर शेख, शाहिद शेख, शशिकांत नाळे, प्रशांत टोणपे यांनी केली.