‘मरताना खर बोलतात;माझ्यावर बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा द्या,म्हणजे कोणी अस वागणार नाही’

- Advertisement -

सेनगाव :  तालुक्यातील साखरा येथील एका २८ वर्षीय विवाहित महिलेने गुरुवारी दुपारी स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या आत्महत्येचे कारण आता पुढे आले असून सामुहिक बलात्कारानंतर नराधम ब्लॅकमेल करत असल्याने तिने टोकाचे पाऊल उचले असल्याचे मृत्यूपूर्वीच्या सुसाईड नोट मधून पुढे आले आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील साखरा येथील एका २८ वर्षीय महिलेने गुरुवारी (दि.१३)  राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी तपासात पोलिसांना घटनास्थळावरून सुसाईड नोट आढळून आली. यानुसार, महिला २२ डिसेंबर २०१५ रोजी घरात लहान मुलीसोबत असताना चंद्रभान गणपत कायंदे, प्रमेश्‍वर नारायण वावरे, सुरेश नामदेव कायंदे तिघांनी तिच्यावर बलात्कार करून त्याचा व्हिडीओ तयार केला होता. हा व्हिडीओ गावातील लोकांना दाखवत व महिलेस ब्लॅकमेल करत असत. या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे महिलेने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. त्या तिघांची चौकशी करून त्यांना सजा द्यावी. मरताना माणुस खरे बोलतो तसे मी खरे बोलत आहे. मी माझ्या मनानेच फाशी घेत असून त्या तिघांना सजा व्हावी अशी माझी इच्छा आहे. त्यांना शिक्षा झाल्यानंतर पुन्हा गावात कोणी गैरकृत्य करणार नाही असेही नोटमध्ये महिलेने नमूद केले आहे.

पोलिसांनी नोट जप्त केली असून चंद्रभान गणपत कायंदे, प्रमेश्‍वर नारायण वावरे, सुरेश नामदेव कायंदे ( रा.साखरा ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपी फरार असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, यापूर्वी मयत महिलेचे  बलात्काराचे प्रकरण सेनगाव पोलीस स्थानकात दाखल होते. मात्र या प्रकरणाकडे पोलिसांनी गांभीर्याने न घेतल्याने महिला दुर्देवी आत्महत्या करण्याची वेळ आली आहे असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सरदारसिंह ठाकूर हे करत आहेत.

- Advertisement -