Home ताज्या बातम्या सिलिंडर दरवाढी विरोधात बीड जिल्हा काँग्रेस कमिटीची निदर्शने

सिलिंडर दरवाढी विरोधात बीड जिल्हा काँग्रेस कमिटीची निदर्शने

0

बीड: स्वयंपाकासाठी लागणारा गॅस हा प्रत्येकाच्या घरातील अत्यावश्यक बाब आहे. परंतु, मागील सहा महिन्यापासून मोदी सरकार महिन्याच्या एक तारखेला सतत सिलेंडर गॅसची दरवाढ करून सामान्य गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणण्याचे काम करत आहे. याला विरोध करण्यासाठी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

एक सप्टेंबर पासून प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला नियमीत घरगुती गॅसची दरवाढ केली जात आहे. ही दरवाढ 10 रुपयांपासून ते 50 रुपयांपर्यंत केली जात होती. मात्र, यावेळेस पहिल्यांदाच घरगुती गॅसची दरवाढ एकवेळस 145 रूपायांनी केली व ती पण एक तारखेला न करता दिल्लीच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 13 फेब्रुवारीला करण्यात आली. जनतेच्या भावनेची एक प्रकारे क्रूर चेष्टा केली जात आहे. माता-भगीनींच्या डोळ्यातील अश्रू बंद करण्यासाठी मोदी सरकार गॅस देत असल्याचे सांगत असताना साडे चारशे रुपयाचा गॅस 920 रुपये पर्यंत दरवाढ करून सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणण्याचे काम हे सरकार करत आहे. याचा निषेध बीड जिल्हा काँग्रेस कमिटी करत असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सकाळी निदर्शने करून निवेदन देण्यात आले.