Home शहरे अमरावती कोरोनो व्हायरसच्या अफवेनं केलं पोल्ट्री व्यवसायिकाचं 8 लाखांचं नुकसान

कोरोनो व्हायरसच्या अफवेनं केलं पोल्ट्री व्यवसायिकाचं 8 लाखांचं नुकसान

0

अमरावती : चीनमध्ये कोरोनो व्हायरसमुळे अनेकांचे जीव गेलेत तर भारतात कोंबडीवरही कोरोनो व्हायरस असल्याच्या अफवा सोशल मीडियावर होत असल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजारच्या शेतकऱ्याला तब्बल 8 लाख रुपयांचा फटका बसला आहे. कोरोनोच्या भीतीमुळे कोंबडीचे भाव कमी झाले आहेत. तर अनेकांनी चिकन खाने बंद केले आहे. मात्र, कोंबडीवर कोरोनो नसून निव्वळ ही अफवा असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील लसनापूर येथील आकाश खुरद या युवा शेतकऱ्यांने शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री फॉर्म (कुकुटपालन) व्यवसाय आपल्या शेतीत सुरु केला आहे. त्यांच्या दोन प्लँट मध्ये 10 हजार पक्षी आहेत. मात्र कोरोनोचे व्हायरस हे कोंबडीत असल्याने कोंबडीचे चिकन व अंड्यांचे बाजारभाव गडगडले आहेत. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या दहा दिवसापासून सोशल मीडियावरील कोरोनो अफवेमुळे पूर्वी 80 रुपयाला विकली जाणारी कोंबडी आता 35 रुपयाला विकली जात आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे जवळपास 8 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांनी एक पक्षी 25 रुपयाला खरेदी करून त्यांचे पालन पोषण केले. मात्र, कोंबडीवर कोरोनो असल्याची भीती असल्याची अफवा या शेतकऱ्याला घातक ठरली आहे.