Home ताज्या बातम्या पुलवामा हल्ल्यातील शहिद जवानाला ग्रामस्थांनी वाहिली श्रद्धांजली

पुलवामा हल्ल्यातील शहिद जवानाला ग्रामस्थांनी वाहिली श्रद्धांजली

0

बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वीरपांग्रा येथील शहीद नितीन राठोड हे पुलवामा हल्ल्यात शाहिद झाले होते. त्याला आज वर्ष पूर्ण होतय. त्यांच्या मूळगावी त्यांना ग्रामस्थानी आणि नातेवाईकांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी गावात त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक ही काढण्यात आली. तर शाहिद जवान नितीन यांच्या वडिलांनी ही त्यांना श्रद्धांजली वाहत त्यांना त्यांच्या मुलाची आजही आठवण येत असल्याचे सांगितलं. तर सरकारने याकडे लक्ष घालून हल्ले होणार नाहीत याची काळजी घ्यावी अशी मागणी यावेळी भाऊ प्रवीण राठोड यांनी केली.

दरम्यान, पुलवामा हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या हल्ल्यात आजच्याच दिवशी आपले 40 जवान शहीद झाले होते. जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर हा हल्ला झाला होता. आज देशातील प्रत्येक नागरिक या जवानांना सलाम करत आहे. सीआरपीएफनेही या जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘हम भूले नही, हमने छोडा नही’ असे ट्विट सीआरपीएफने केले आहे.

शुक्रवारी सीआरपीएफने ट्विट करत लिहिले की, ‘तुमच्या शौर्याचे गीत, कर्कश आवाजात हरवलेले नाही. एवढा गर्व होता की, आम्ही जास्त वेळ रडलोही नाही’ तसेच पुढे लिहिले आहे की, ‘आम्ही विसरलो नाही, आम्ही विसरणार नाही. आमच्या ज्या भावांनी पुलवामा हल्ल्यात देशासाठी प्राण अर्पण केले. त्याला आम्ही सलामकरतो. त्यांच्या कुटुंबाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही उभे आहोत’

पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामा येथे हल्ला केला होता. एका गाडीने सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर धडक दिली होती. यानंतर मोठा स्फोट झाला. यामध्ये 40 जवानांचा मृत्यू झाला होता.