Home ताज्या बातम्या आर.सी. पटेल इंग्लिश स्कूलमध्ये महोत्सव

आर.सी. पटेल इंग्लिश स्कूलमध्ये महोत्सव

0

तºहाडी : शिरपूर तालुक्यातील वरुळ येथील आर.सी. पटेल इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास शाळेचे चेअरमन प्रसन्न जैन, संस्थेचे सीईओ डॉ.उमेश शर्मा, विस्तार अधिकारी पी.झेड. रणदिवे, केंद्रप्रमुख एम.एस. सूर्यवंशी, जि.प. सदस्य भीमराव ईशी, बाजार समितीचे उपसभापती इशेंद्र ईशी, जुने भामपुर सरपंच बाळासाहेब पाटील, लोंढरे सरपंच प्रदीप पाटील, वरूळ उपसरपंच नरेंद्र मराठे, के.जे. माळी, राजेंद्र जाधव, सुनील पाकळे, पंकज मराठे, राखी अग्रवाल, क्रीडा समन्वयक राकेश बोरसे यांच्यासह संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक स्मिता पंचभाई, रिबेका नेल्सन, जयश्री चव्हाण, पल्लवी राजपूत, निलोफर खान, पी.आर. साळुंखे, सिल्व्हिया जानवे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका एलिझाबेथ जानवे यांनी केले. हर्षल निकुंभ, नंदिनी कोळी, प्रसन्न जैन, डॉ.उमेश शर्मा यांनी मशाल पेटवून क्रीडा महोत्सवाला सुरुवात केली. क्रीडा स्पर्धेआधी जुन्या खेळांचे दर्शन घडविणारे गीत, एरोबिक्स, लेझीम नृत्य व मानवी मनोरे सादर करण्यात आले. प्री-प्रायमरी व प्रायमरी विभागात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना प्रमाणपत्र, सुवर्णपदक, रौप्यपदक व कांस्यपदक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज चित्ते यांनी केले. कार्यक्रमासाठी किरण वाघ, लोकेश बोरसे, शामकांत पवार, मयूर वाणी, प्रशांत सावळे, मोनाली बोरगावकर, रुपाली पाटील, ममता पाटील, भाग्यश्री चौधरी यांनी प्रयत्न केले.