Home ताज्या बातम्या मुंबई-पुणे दरम्यान धावणार इलेक्ट्रिक बस

मुंबई-पुणे दरम्यान धावणार इलेक्ट्रिक बस

0

मुंबई आणि पुणे या शहरांना जोडणारी इलेक्ट्रिक बससेवा सुरू झाल्याबद्दल गडकरी यांनी आनंद व्यक्त केला. अशा प्रकारे दोन शहरांना जोडणारी पर्यावरणपूरक सेवा सुरू व्हावी यासाठी मंत्री म्हणून चारपाच वर्षांपासून प्रयत्न करत होतो. इलेक्ट्रिक तसेच जैव इंधनावर चालणाºया बसगाड्यांची तसेच वाहनांची संख्या वाढायला हवी. इथेनॉल, मिथेनॉल, जैव इंधन, बायोसीएनजी आणि इलेक्ट्रिक अशा पर्यायी इंधनांना प्राधान्य दिले आहे. आगामी काळात यात हायड्रोजन इंधनाचाही समावेश केला जाईल. इंधन देशात तयार व्हावे, असा सरकारचा प्रयत्न आहे. पेट्रोल-डिझेल या सध्याच्या आपल्या वापरातील इंधनाच्या आयातीसाठी ७ लाख कोटी दरवर्षी खर्च करतो. या इंधनामुळे हवेच्या प्रदूषणाची समस्या आहे. त्यामुळे आयातीला पर्याय देणारा, स्वस्त आणि पर्यावरणपूरक व्यवस्था उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याच आधारावर बसगाड्या आणि परिवहन व्यवस्था निर्माण करण्याचा माझ्या विभागाचा प्रयत्न असल्याचे गडकरी यांनी या वेळी स्पष्ट केले.

सध्या इलेक्ट्रिक बसचे मर्यादित उत्पादन आहे. भविष्यात उत्पादन वाढून बसगाड्यांच्या किमती कमी होतील. शिवाय, पर्यायी इंधनामुळे प्रवासाचा खर्च कमी होऊन प्रवासही आरामदायक बनेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. आज देशातील पहिल्या आंतरजिल्हा सेवेला सुरुवात झाली. आगामी तीन वर्षात मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वेवरही अशा सेवा सुरू होतील. त्यासाठी या महामार्गाचे काम जलद पूर्ण करण्यात येत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

इलेक्ट्रिक बस चार्ज करण्यासाठी स्टेशन उभारले आहेत. बस पूर्णत: चार्ज होण्यासाठी दोन तास अपेक्षित आहेत. एकदा चार्ज केल्यावर ताशी शंभर किमी वेगाने तीनशे किमीपर्यंत प्रवास करण्याची या बसची क्षमता आहे. या ४३ आसनी बसमध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत.