Home ताज्या बातम्या घरकुल लाभार्थ्यांचे तहसील समोर डफडे बजाव आंदोलन

घरकुल लाभार्थ्यांचे तहसील समोर डफडे बजाव आंदोलन

0

यवतमाळ: महागाव तालुक्यातील मुडाणा येथील रमाई घरकुल योजने अंतर्गत लाभार्थ्यांना रेती उपलब्ध नसल्यामुळे, महागाव तालुक्यातील मुडाना गावासह अनेक गावांत रमाई घरकुल योजनेचे काम रखडले आहे. या करता रेती उपलब्ध करून द्यावी यासाठी घरकुल लाभार्थ्यांनी महागाव तहसीलदार यांना निवेदन दिले होते. पण याकडे कोणत्याच प्रकारचे लक्ष देण्यात आले नाही. असे आंदोलकांचे म्हणणे आहे.  म्हणून, वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा रेती उपलब्ध करून न दिल्यामुळे मुडाना येथील घरकुल लाभार्थ्यांनी एक वेगळया आणि अनोख्या प्रकारचे “डफडे बजावो, ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. महागाव तहसील समोर पेंडॉल टाकून जोर जोरात डफडे वाजवून आंदोलकारी शासनाविरुद्ध आपला रोष व्यक्त करताना दिसत आहेत. सध्या तालुक्यात रेती तस्करीचा जोर वाढला असून रेती माफियांकडून शेकडो ब्रास रेती उपसा करून काळ्या बाजारात जास्त किंमतीवर विकली जात आहे असे ही या आंदोलनाकर्त्यांचे म्हणणे आहे.