Home ताज्या बातम्या महिला व लहान मुलांसाठी विशेष शिबीर

महिला व लहान मुलांसाठी विशेष शिबीर

0

महिला व लहान मुलांसाठी विशेष शिबीर

पिंपरी – मा आदरणीय डॉ. पी. डी. पाटील सर ( कुलपती , डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ ) आदरणीय डॉ. सौ. स्मिता जाधव मॅडम ( ट्रस्टी, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ ) यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. डी. वाय .पाटील आयुर्वेद महाविद्यालय , रुग्णालय व संशोधन केंद्र पिंपरी येथे स्त्रीरोग व बालरोग विभागामार्फत १७ फेब्रवारी ते २७ फेब्रवारी २०२० या १० दिवसात विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे .


महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरामध्ये स्त्रीरोग तज्ञांकडून पुढील विकरांसाठी तपासणी करण्यात येईल.पाळीच्या तक्रारी , वंध्यत्व चिकित्सा , गर्भशयाच्या व स्तनाच्या कर्करोगाची प्राथमिक तपासणी मेनोपॉज बद्दल सल्ला व मार्गदर्शन , गर्भसंस्कार मार्गदर्शन -( गर्भसंस्काराचे वर्ग २५/२/२०२०पासून सुरु ).
बालरोग विभागामार्फत ० ते १२ वर्षे वयोगटातील सर्व बालकाची तपासणी करण्यात येईल . या शिबिरात बालरोग तज्ञांकडून बालकांची विविध व्याधींची तपासणी यामध्ये बालदमा , अशक्त बालक, बाल पक्षघात, मतिमंदत्व , त्वचाविकार , मूत्ररोग , उदररोग , तसेच ‘ सुवर्णप्राशन ‘ या बद्दल सल्ला मार्गदर्शन करण्यात येईल.
दि. १७ फेब्रुवारी पासून २७ फेब्रवारी पर्यंत स. ९ ते दु. ४ या वेळेत तपासणी करण्यात येईल रविवारी रुग्णालय बंद राहील . या शिबिराचा जास्तीत जास्त महिला व बालकांनी सह्भागी व्हावे असे आवाहन प्राचार्य डॉ. गुणवंत येवला यांनी केले आहे .
अधिक माहितीसाठी ७७९६६६३३६६ या क्रमांकावर संम्पर्क साधावा .