Home शहरे जळगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात आनंदाच्या वातावरणात साजरे

शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात आनंदाच्या वातावरणात साजरे

0

एरंडोल – .१९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा महाराष्ट्राच्या आराध्य दैवत यांची जयंती शहरासह संपूर्ण तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली ‌
शहरांमध्ये सकाळी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सजीव आरास व सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.


शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ सर्व शिवप्रेमी ,शासकीय अधिकारी ,राजकीय पदाधिकारी यांनी छत्रपतींच्या पुतळ्याची माल्यार्पण केले. व छत्रपतींच्या इतिहासाविषयी माहिती दिली. यात शिवरायांच्या कल्याणकारी योजना व त्यांचा आपण आजही अमलात आणतो . दुष्काळावर मात करणे याविषयी अमित दादा पाटील यांनी आपले विचार मांडले.


तसेच तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांनी शिवरायांची आर्मी मॅनेजमेंट यावर आपले विचार मांडले. सदर कार्यक्रमास नगराध्यक्ष श्री रमेश परदेशी, पोलीस निरीक्षक श्री स्वप्नील उनवणे, नगरपालिका मुख्याधिकारी श्री देशमुख साहेब, विजय अण्णा महाजन ,अहिराव सर राकेश पाटील सर, ज्येष्ठ नागरिक देविदास भाऊ महाजन, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, प्रा. मनोज पाटील ,नगरसेवक अभिजीत पाटील राजू आबा चौधरी,उपनगराध्यक्ष नितीन चौधरी असंख्य शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच शहरातील ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम व बचपन स्कूल यांनी भव्य रॅलीचे आयोजन करून यात छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ ,शहाजी महाराज यांचे सजीव आरास सजविण्यात आले होते ,यामध्ये संस्थाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी शिवप्रतिज्ञा व मार्गदर्शन केले. शहरातील गांधीपुरा भागातून हिंदुत्व ग्रुप श्रीकृष्ण अवतारी यांनी यांनी शहरातील चौकाचौकांमध्ये छत्रपती विषयी माहिती फलक लावून मार्गदर्शन केले ‌ भव्य रॅली काढण्यात आली. तसेच हायवे चौफुलीवर लक्ष्मी नगर येथील नगरसेविका वर्षा ताई शिंदे व शिंदे सर यांनी चौफुलीवर शिव पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. शहरात सर्वत्र सकाळपासून भगवे वातावरण व शिवमय वातावरण तयार झाले होते मोठ्या संख्येने उस्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवत होते.