Home ताज्या बातम्या कोंढव्यातील राजकीय खेळीची शिकार झाली गगन एमरड सोसायटी बेकायदा नळ कनेक्शनवर कारवाई

कोंढव्यातील राजकीय खेळीची शिकार झाली गगन एमरड सोसायटी बेकायदा नळ कनेक्शनवर कारवाई

0

दि.१७/०२/२०२० रोजी कोंढव्यातील ‘गगन एमरड’ सोसायटीत बेकायदा नळ कनेक्शनवर कारवाई करताना पालिका अधिकाऱ्यांचा सोसायटीच्या विश्वस्तांना धक्काबुक्की देण्यात आली. कोंढव्यातील ‘गगन एमरड’ सोसायटी ने घेतलेल्या बेकायदा नळ कनेक्शनवर पुणे महापालिकेच्यावतीने कारवाई करून बेकायदा नळ कनेक्शन तोडण्यात आले. यावेळी लष्कर पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता तपन चिकणे आणि कनिष्ठ अभियंता शरयु टिकले व त्यांच्या सहकाऱ्यांनी विश्वस्तांच्या विरोधाला न जुमानता कठोरपणे कारवाई करून नळ कनेक्शन तोडले व सोसायटीतील विश्वस्तांना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाऊन काही वेळाने समज देऊन सोडण्यात आले.


गेल्या महिन्यात शरयू टिकले यांनी बेकायदा नळ कनेक्शन ची पाहणी केली होती पण ही पाहणी नसून राजकीय दबावाखाली केली गेलीली खेळी होती असा आरोप सोसायटीतील विश्वस्तांनी केलाय. तसेच पाहणी करतेवेळी फक्त ‘ गगन एमरड ‘ या सोसायटीची करण्यात आली होती, बाकी त्यांच्या विभगाच्या व्यतिरिक्त असलेल्या परिसराची पाहाणी का करण्यात आली नाही असा सवाल स्थानिक लोकांकडून उपस्थित केला जात आहे ?.


दरम्यान ही कारवाई होत असल्याचे समजताच तेथील वरिष्ठ राजकीय पुढारी मंडळी तेथे आले होते. त्यांनी कोणाच्या परवानगीने ही कारवाई केली अशी विचारणा अधिकाऱ्यांकडे केली तेव्हा अधिकाऱ्यांनी आमच्याकडे आलेल्या तक्रारीवरून ही कारवाई केली, असे सांगत त्यांनी त्यांनी अधिकाऱ्यांना सागितले की कुणी एकाला वेठीस नधरता तसेच कुठल्याही राजकीय दबावाला बळी नपडता शासन नियमानुसार कारवाई करावी. महापालिका अधिकाऱ्यांनी तक्रार न दिल्याने शेवटी विरोध करणाऱ्यांना सोडून देण्यात आले.