Home ताज्या बातम्या हा प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर झळकणार मराठी चित्रपटात

हा प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर झळकणार मराठी चित्रपटात

0

श्रीसंतच्या मराठी चित्रपटाचे नाव मुंबईचा वडापाव असून या चित्रपटाची निर्मिती पीके अशोकन आणि मेहराली पोईलंगल इस्माइल करत आहे. हे दोघेही मल्याळम इंडस्ट्रीशी संबंधित असून मल्याळम आणि मराठी इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध कलाकार या चित्रपटात झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटातील श्रीसंतची व्यक्तिरेखा त्याने आजवर चित्रपटात साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी असल्याची चर्चा रंगली आहे.

https://www.instagram.com/p/B2D1xhAA1H9/?utm_source=ig_web_copy_link

श्रीसंतच्या मुंबईचा वडापाव या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण एप्रिल महिन्यात सुरू होणार असून या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यात आणि नाशिकमध्ये होणार आहेत. या चित्रपटाविषयी अधिकृत घोषणा लवकरच चित्रपटाच्या निर्मात्यांकडून केली जाणार आहे. श्रीसंतने भारतासाठी अनेक क्रिकेट मॅचेस खेळल्या. पण आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामध्ये श्रीसंतवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यावर बंदी घालण्यात आली.